शहरं
Join us  
Trending Stories
1
"चीनने भारताची जमीन बळकावली हे तुम्हाला कसं कळलं? तुम्ही खरे भारतीय असता तर…’’, सुप्रीम कोर्टाने राहुल गांधींना सुनावले खडेबोल  
2
'तो' खेळणार नाही असं इंग्लंडनेच सांगितलं होतं, पण आता बॅटिंग करणार; असं कसं? ICC नियमांत बसतं?
3
"२० वर्षांनी आम्ही भाऊ एकत्र येऊ शकतो, मग..."; मनसे मेळाव्यात राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना कानमंत्र
4
"माझ्या नादी लागू नका, पुराव्यासह फाईल्स उघडू..."; भाजपात प्रवेश करताच शिंदेसेनेच्या नेत्याला इशारा
5
"मुंबईत जो येईल त्याचं स्वागत करू..."; निशिकांत दुबेंबाबत देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
6
रॉयल एनफिल्डने चीनचे रेअर अर्थ मटेरिअल टाळले! नवीन धातू वापरला, ऑटो कंपन्या चकीत झाल्या...
7
काहीही करा, ‘हम नही सुधरेंगे’; CM देवेंद्र फडणवीसांचा क्लास वाया, वादग्रस्त विधाने सुरूच!
8
AI घेणार तुमच्या नोकरीची जागा? गुंतवणूकदार विनोद खोसला यांचा इशारा, म्हणाले यातून वाचायचं असेल तर..
9
‘झुकेगा नही’! ट्रम्प यांची धमकी, पण सरकार ठाम; अमेरिकेला भारताचं स्वतंत्र धोरण का खुपतंय?
10
मराठी अभिनेत्याचं साउथ इंडस्ट्रीत काम करण्याचं होतं स्वप्न, लॉकडाऊननंतर हैदराबाद गाठलं अन्...
11
चहा करताना 'ही' छोटीशी चूक कराल तर आयुष्याला मुकाल, योग्य पद्धत कोणती एकदा बघाच
12
ऑपरेशन महादेवमध्ये मारले गेलेले सगळे दहशतवादी पाकिस्तानीच! 'त्या' एका पुराव्याने समोर आली कुंडली
13
IND vs ENG: ३५ धावा की ४ गडी... पाचवी कसोटी निर्णायक वळणावर, 'हा' घटक भारतासाठी ठरेल 'गेमचेंजर'
14
ट्रम्प यांच्यासोबतची मैत्री तुटल्यानंतर मस्क मोठ्या अडचणीत; टेस्लाला द्यावे लागणार तब्बल २ हजार कोटी
15
ट्रम्पच्या जिगरी दोस्तावर पाकिस्तान का चिडला? पोस्ट लिहीत व्यक्त केला राग! शाहबाज शरीफ म्हणाले... 
16
"सचिन माझ्या मुलाचा बाप...", महिलेने दाखवला DNA रिपोर्ट; राजा रघुवंशीच्या घरात भलताच वाद
17
हृदयस्पर्शी! बाळासाठी वडील झाले वासुदेव, पुराच्या पाण्यातून काढली वाट, भावुक करणारा Video
18
Shravan 2025: शास्त्रानुसार, संसारी व्यक्तीने रुद्राक्षाची जपमाळ ओढावी, पण गळ्यात घालू नये!
19
रक्षाबंधन नेमके कधी आहे? शुभ मुहूर्त कोणता? पाहा, महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
20
नोकरीसाठी विदेशात जायचंय तर पत्नीला भारतात ठेवा, अटीविरुद्ध ‘तो’ सुप्रीम कोर्टात

सातारा जिल्ह्यात परतीच्या पावसाची जोरदार हजेरी, महाबळेश्वरला ६४ मिलीमीटर पाऊस

By नितीन काळेल | Updated: October 2, 2023 14:06 IST

यावर्षी मान्सूनच्या पावसाला उशिरा सुरूवात

सातारा : जिल्ह्यात परतीचा पाऊस पडत असून पश्चिम भागातही हजेरी लावत आहे. त्यामुळे २४ तासांत सर्वाधिक पर्जन्यमानाची महाबळेश्वरला ६४ मिलीमीटरची झाली आहे. तर नवजालाही चांगला पाऊस झाला. कोयना धरणातही पाण्याची आवक वाढली असून पाणीसाठा ९३ टीएमसीवर गेला आहे.जिल्ह्यात यावर्षी मान्सूनच्या पावसाला उशिरा सुरूवात झाली. जून महिन्याच्या उत्तरार्धात पाऊस सुरू झाला. या पावसाचा जोर जुलै महिन्यापर्यंत होता. यामुळे पश्चिम भागात धुवांधार पावसाने दाणादाण उडवून दिली.  त्याचबरोबर धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी, उरमोडीसह कोयना धरणात चांगला पाणीसाठा झाला. पण, ऑगस्स्ट महिना उजाडल्यानंतर दोन महिन्यात पावसाचे प्रमाण कमी राहिले. त्यामुळे बलकवडी आणि तारळी वगळता इतर धरणांत कमी पाणीसाठा राहिला. सध्या तर परतीचा पाऊस सुरू झाल्याने प्रमुख धरणे भरण्याबाबत साशंकता व्यक्त होत आहे. त्यामुळे यंदा सिंचनाच्या पाण्याचाही प्रश्न निर्माण होऊ शकतो. कारण, उरमोडी धरणात ६० टक्केही पाणीसाठा नाही.  या धरणातील पाण्यावर माण, खटाव या दुष्काळी तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न अवलंबून आहे.जिल्ह्याच्या पूर्व भागात सध्या परतीचा पाऊस पडत आहे. तसेच पश्चिम भागातील कास, बामणोली, कोयनानगर, नवजा, तापोळा आणि कांदाटी खोऱ्यात  पाऊस होत आहे. यामुळे कोयना धरणात पाण्याची आवक वाढली आहे. सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत सर्वाधिक पाऊस महाबळेश्वरला ६४ मिलीमीटर झाला. तर कोयनानगर येथे २८ आणि नवजाला ३७ मिलीमीटरची नोंद झाली आहे. तर एक जूनपासून आतापर्यंत सर्वाधिक पाऊस नवजा येथे ५६१४ मिलीमीटर पडलेला आहे. तसेच कोयनेला ३९९३ आणि महाबळेश्वरला ५४४८ मिलीमीटर झाला आहे. तर सोमवारी सकाळच्या सुमारास कोयना धरणात ५२३१ क्यूसेक वेगाने पाणी येत होते.  धरण पाणीसाठा ९३.७७ टीएमसी झाला होता. तरीही धरण भरण्यासाठी ११  टीएमसीवर पाण्याची गरज आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसMahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थान