रहिमतपूर परिसरात दमदार पाऊस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:26 IST2021-06-18T04:26:56+5:302021-06-18T04:26:56+5:30

रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर परिसरात दमदार पाऊस कोसळला. या पावसामुळे शेतकरी सुखावला आहे. रहिमतपूर परिसरात बुधवारी दिवसभर उघडझाप ...

Heavy rain in Rahimatpur area | रहिमतपूर परिसरात दमदार पाऊस

रहिमतपूर परिसरात दमदार पाऊस

रहिमतपूर : कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर परिसरात दमदार पाऊस कोसळला. या पावसामुळे शेतकरी सुखावला आहे.

रहिमतपूर परिसरात बुधवारी दिवसभर उघडझाप स्वरूपात सुरू असलेल्या पावसाने अर्ध्या रात्रीपासून जोर धरला. पहाटेपर्यंत पावसामुळे सर्वत्र पाणीच पाणी झाले होते, तर गुरुवारी सकाळपासून उघडझाप स्वरूपात पावसाच्या दमदार सरी कोसळत होत्या. त्यातच मे महिन्यामध्ये झालेल्या दमदार मान्सूनपूर्व पावसामुळे पेरणीपूर्व मशागती शेतकऱ्यांनी उरकून घेतल्या होत्या. जूनच्या प्रारंभी झालेल्या पावसानंतर मिळालेल्या उघडीपीत बहुतांशी शेतकऱ्यांनी सोयाबीन व कडधान्याची पेरणी उरकून घेतली. आले व हळद लागवडही पूर्ण झाली आहे. तसेच आडसाली ऊस लागणीचा दणका सुरू आहे. लागवडीबरोबरच खोडवा उसाला भरी घालून बहुतांशी शेतकरी मोकळे झाले आहेत. त्यामुळे दमदार झालेल्या पावसामुळे शेतकरी सुखावला आहे. रहिमतपूरसह परिसरातील साप, वेळू, बेलेवाडी, अपशिंगे, अंभेरी, वेलंग, कण्हेरखेड, पिंपरी आदी गावात दमदार पाऊस कोसळला आहे.

Web Title: Heavy rain in Rahimatpur area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.