शहरं
Join us  
Trending Stories
1
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
2
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
3
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
4
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
5
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
6
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
7
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
8
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
9
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
10
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
11
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
12
पत्नीने पतीसोबत राहण्यास दिला नकार, उच्च न्यायालयाने प्रियकरासोबत राहण्याची दिली परवानगी
13
इराण युद्धाचा परिणाम! 'मूडीज'ने भारताचा विकास दर अंदाज घटवला; महागाई आणि व्याजदर वाढण्याचा धोका
14
इराणचा मोठा दावा! पायलटला शोधायला आलेले अमेरिकेचे C-130 विमान पाडले 
15
Middle East War: मध्य पूर्वेतील युद्ध भडकणार? अमेरिकेचं सर्वात घातक मिसाइल युद्धाच्या रणांगणात, इराणवर महासंकट!
16
मतदार यादीच्या कामाचा ‘शिक्षण-आरोग्य’वर ताण; ‘आरोग्य’चे ३ हजार, 'शिक्षण'च्या २ हजार कर्मचाऱ्यांचा समावेश
17
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
18
थारच्या वाळवंटातून कच्च तेल उत्पादनात विक्रमी वाढ; भारताचे आयातीवरील अवलंबित्व कमी होणार?
19
AI च्या नावाखाली layoff सुरू! Oracle, Amazon, Meta...२०२६ मध्ये हजारो कर्मचाऱ्यांना नारळ
20
मुंबई हादरवण्याचा कट उधळला, २५ सेकंदाच्या व्हिडिओनं पोलखोल; पाकिस्तानी नेटवर्कचा खेळ बिघडला
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यात जोर’धार’, कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविला, जुना संगमनगर धक्का पूल पाण्याखाली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 16, 2025 13:23 IST

दरवाजे साडे तीन फुटांवर

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर कायम असल्याने कोयना धरणातही आवक वाढली आहे. त्यामुळे धरणाचे सहा दरवाजे आता दीड वरुन साडे तीन फुटापर्यंत उचलण्यात आले आहेत. त्यामुळे दरवाजातून ९ हजार ३०० आणि पायथा वीजगृह २ हजार १०० असा एकूण ११ हजार ४०० क्यूसेक विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे. यामुळे कोयना नदीपातळीत वाढ झाल्याने जुना संगमनगर धक्का पूल पाण्याखाली गेला आहे.जिल्ह्यात मागील एक महिन्यापासून पाऊस आहे. पश्चिम भागात तर एकसारखा पाऊस होत आहे. त्यातच धरणक्षेत्रात संततधार असल्याने पाणीसाठा वेगाने वाढत चालला आहे. त्यामुळे पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी विसर्ग करण्यात येत आहे. कोयना धरण पाणलोट क्षेत्रातही तीन दिवसांपासून संततधार आहे. बुधवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत कोयना येथे ४४ मिलिमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली. तर नवजा येथे ८४ आणि महाबळेश्वरला १३१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. यामुळे कोयना धरणात पाण्याची आवक वाढली. सकाळच्या सुमारास २६ हजार ४०४ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर ७७.२६ टीएमसी पाणीसाठा झाला होता. धरणातील पाणीपातळी आणि मान्सूनचा उर्वरित कालावधी विचारात घेऊन कोयना धरण व्यवस्थापनाने दरवाजातून विसर्ग वाढविण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार दुपारी १२ वाजता धरणाचे सहा वक्र दरवाजे दीड फुटावरुन साडे तीन फुटापर्यंत वर उचलण्यात आले आहेत. त्यामुळे ९ हजार ३०० क्यूसेक विसर्ग दरवाजातून होऊ लागला आहे. तर पायथा वीजगृहाची दोन्ही युनीट सुरूच आहेत. त्यातूनही २ हजार १०० क्यूसेक विसर्ग केला जातोय.यामुळे धरणातून एकूण ११ हजार ४०० क्यूसेक पाणी कोयना नदीपात्रात सोडले जात आहे. या विसर्गामुळे नदीच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. कोयना क्षेत्रात पावसाचा जोर वाढल्यास आणखी विसर्ग करावा लागणार आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे.

प्रमुख प्रकल्प ७४ टक्के भरले; १२,३९३ क्यूसेक विसर्ग..जिल्ह्याच्या पश्चिम भागातच कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी आणि उरमोडी हे मोठे पाणी प्रकल्प आहेत. या धरणात ११०.४६ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. ही धरणे ७४.४७ टक्के भरलीत. पावसाळ्याचा विचार करुन पाणीपातळी नियंत्रित करण्यासाठी चार धरणांतून विसर्ग सुरू आहे. दुपारच्या सुमारास या धरणातून एकूण १२ हजार ३९३ क्यूसेक विसर्ग केला जात होता. यामुळे नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झालेली आहे.