शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
5
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
6
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
7
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
8
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
9
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
10
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
11
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
12
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
13
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
14
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
15
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
16
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
17
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
18
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
19
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
20
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
Daily Top 2Weekly Top 5

सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर; कोयना धरणात २४ तासांत साडेतीन टीएमसी'ने वाढ, पाणीसाठा पोहचला..

By नितीन काळेल | Updated: August 26, 2024 19:03 IST

गतवर्षीची पाणीपातळी मागे टाकली

सातारा : जिल्ह्यात पावसाचा जोर असून, २४ तासांत नवजा येथे १५२, कोयनेला १४६ आणि महाबळेश्वरमध्ये १४५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. यामुळे कोयना धरणातही पाण्याची आवक वाढली असून, सोमवारी सकाळच्या सुमारास पाणीसाठा ९६ टीएमसीजवळ पोहोचला. तसेच धरण ९१ टक्के भरले. परिणामी, धरणाने गतवर्षीची पाणीपातळी मागे टाकली आहे. तर धरणात २४ तासांत सुमारे साडेतीन टीएमसी साठा वाढला आहे.जिल्ह्यात यावर्षी जून महिन्याच्या सुरुवातीपासूनच पावसाला सुरुवात झाली. जून आणि जुलै महिन्यात पावसाचे प्रमाण चांगले राहिले. यामुळे खरीप हंगामातील पेरणी वेळेवर सुरू होऊन समाप्त झाली. यामध्ये जुलै महिन्याच्या मध्यानंतर पश्चिम भागातील कोयना, नवजा, महाबळेश्वर, कास, बामणोली, तापोळासह संपूर्ण कांदाटी खोऱ्यात अतिवृष्टी होती. सलग १२ दिवस पावसाने डोळा उघडला नव्हता. त्यामुळे तळ गाठलेल्या कोयना, धोम, बलकवडी, कण्हेर, तारळीसह उरमोडी या प्रमुख प्रकल्पांत मोठ्या प्रमाणावर पाणीसाठा झाला. त्यातच या प्रमुख प्रकल्पांची पाणी साठवण क्षमता १४८ टीएमसीवर आहे. सध्या ही प्रमुख धरणे ९० टक्क्यांवर भरली आहेत. त्यातच मागील तीन दिवसांपासून पावसाचा पुन्हा जोर वाढला असल्याने धरणे भरण्याच्या स्थितीत आहेत.

सोमवारी सकाळी ८ वाजेपर्यंतच्या २४ तासांतील आकडेवारीनुसार जिल्ह्याच्या पश्चिम भागात जोरदार पाऊस सुरू असल्याचे दिसून येत आहे. यामुळे शेतशिवारात, भात खाचरात पाणी साचून राहिले आहे. तर २४ तासांत नवजा येथे १५२ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. एक जूनपासून आतापर्यंत नवजा येथे तब्बल ५ हजार ४९१ मिलिमीटर पाऊस झाला आहे. तसेच कोयनेला ४ हजार ६३४ आणि महाबळेश्वर येथे ५ हजार २६५ मिलिमीटर पर्जन्यमान झाले. त्याचबरोबर कोयना धरणात २४ तासांत ३.४१ टीएमसी पाणीसाठा वाढला. सोमवारी सकाळच्या सुमारास धरणात ९५.७९ टीएमसी पाणीसाठा झाला होता. ९१.०१ टक्केवारी साठ्याची आहे. आता धरण भरण्यासाठी ९ टीएमसीहून अधिक पाण्याची गरज आहे. तर धरणातील विसर्ग बंदच आहे.

पाऊस वाढला; धरणांतून पुन्हा विसर्ग..जिल्ह्याच्या पश्चिम भागात तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. यामुळे प्रमुख धरणांतून पुन्हा पाणी सोडणे सुरू झाले आहे. परिणामी, नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. सातारा तालुक्यातील कण्हेर धरणाच्या वीज गृहातून ४००, तर दरवाजातून दोन हजार क्युसेक विसर्ग नदीपात्रात करण्यात येत आहे. यामुळे वेण्णा नदीकाठावरील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. मोरणा गुरेघर मध्यम प्रकल्पातूनही विसर्ग सुरू करण्याबाबत नियोजन झाले आहे. वाई तालुक्यातील बलकवडी धरणातही पावसामुळे आवक वाढली. त्यामुळे रविवारी रात्रीपासूनच विसर्ग सुरू करण्यात आला आहे. हे पाणी धोम धरणात जात असल्यामुळे कृष्णा नदीच्या काठावरील बलकवडी, परतवडी, दह्याट, बोरगावसह अन्य गावांतील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

कोयनेत गतवर्षी ९४ टीएमसी साठा..जिल्ह्यात गेल्यावर्षी अपुरे पर्जन्यमान झाले होते. वार्षिक सरासरीच्या ७० टक्क्यांच्या आसपासच पाऊस होता. यामुळे अनेक प्रमुख धरणे भरली नव्हती. यामध्ये कोयना धरणाचाही समावेश आहे. कोयनेत गतवर्षी ९४ टीएमसीवर साठा झाला होता. हा टप्पा आता पार झालेला आहे. पावसाचा जाेर पाहता, ऑगस्टअखेर धरण भरू शकते, असा अंदाज आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRainपाऊसKoyana Damकोयना धरण