आरोग्यसेविकांचा समाजरक्षक पुरस्काराने गौरव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:40 IST2021-09-11T04:40:46+5:302021-09-11T04:40:46+5:30
खंडाळा : कोरोनाकाळात खंडाळा तालुक्यातील आरोग्य विभागातील सर्व परिचारिकांनी अहोरात्र लोकांची सेवा करून जनआरोग्याची काळजी घेतली. त्यामुळेच अनेकांचे ...

आरोग्यसेविकांचा समाजरक्षक पुरस्काराने गौरव
खंडाळा : कोरोनाकाळात खंडाळा तालुक्यातील आरोग्य विभागातील सर्व परिचारिकांनी अहोरात्र लोकांची सेवा करून जनआरोग्याची काळजी घेतली. त्यामुळेच अनेकांचे जीव सुरक्षित राहिले. या कठीण काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या परिचारिकांचा रोटरी क्लबच्या वतीने ‘समाज रक्षक’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
खंडाळा येथील किसन वीर सभागृहात आयोजित कार्यक्रमात कोरोना काळामध्ये आरोग्य सेविकांनी केलेल्या योगदानाबद्दल हा पुरस्कार देऊन ७७ परिचारिकांना सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी सभापती राजेंद्र तांबे, तहसीलदार दशरथ काळे, गटविकास अधिकारी माणिकराव बिकुकले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अविनाश पाटील, रोटरी क्लबचे अध्यक्ष अविनाश वाडकर, सचिव लक्ष्मण कोंडे, खजिनदार शैलेद्र गोडबोले यासह रोटरीचे सदस्य उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे रोटरियन डॉ. सुनील धुमाळ यांनी सूत्रसंचालन केले. इम्तियाज खान यांनी रोटरीच्या योगदानाबद्दल माहिती दिली, तर फिरोज पठाण यांनी आभार मानले.
(कोट..)
रोटरीकडून आरोग्य क्षेत्रात कायमच योगदान असते आणि मात्र असा उपक्रम पहिल्यांदाच राबविला. या महिला परिचारिकांनी अतिशय धोका पत्करून सेवा केली. त्यांचा भगिनी म्हणून गौरव करणे, हे रक्षाबंधननिमित्त कर्तव्य होते.
-अविनाश वाडकर, अध्यक्ष रोटरी क्लब