शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
2
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
3
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
4
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
5
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
6
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
7
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
8
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
9
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
10
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
11
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
12
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
13
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
14
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
15
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
16
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी
17
Asia Cup 2025 Hockey : पाकिस्तानची माघार; भारतात येऊन खेळण्यास दिला नकार, आता...
18
नागरिकांचं आरोग्य महत्त्वाचं, आदेशाचा अवमान करू नका; मुंबई उच्च न्यायालयाने पिळले कान
19
प्रेमाच्या नादात नातंच विसरले! २ मुलांच्या आईने भाच्याशी केलं लग्न, नवऱ्याला पाठवले फोटो
20
Aisa Cup 2025: सूर्यकुमार यादव संघात नसेल तर कर्णधार कोण? 'या' ३ खेळाडूंमध्ये चुरशीची स्पर्धा

मुख्याध्यापकाने नोकरीचे गाव बनविले ‘योगा ग्राम’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 20, 2019 23:30 IST

सातारा तालुक्यातील सांबरवाडी अवघ्या नव्वद उंबऱ्यांचे गाव. या भागात आरोग्याच्या सुविधाही फारशा मिळत नाहीत. तेथील ग्रामस्थांसाठी योगा सर्वोत्तम पर्याय आहे. हे ओळखून शिक्षक प्रल्हाद पारटे यांनी एक वर्षापूर्वी योगा वर्ग सुरू केले.

ठळक मुद्देवर्षभर विनामोबदला उपक्रम : ग्रामस्थ भल्या पहाटेच येतात योगाच्या वर्गाला; ग्रामस्थांत समाधानाचे वातावरण --जागतिक योग दिन

लक्ष्मण गोरे ।बामणोली : सातारा तालुक्यातील सांबरवाडी अवघ्या नव्वद उंबऱ्यांचे गाव. या भागात आरोग्याच्या सुविधाही फारशा मिळत नाहीत. तेथील ग्रामस्थांसाठी योगा सर्वोत्तम पर्याय आहे. हे ओळखून शिक्षक प्रल्हाद पारटे यांनी एक वर्षापूर्वी योगा वर्ग सुरू केले. गावकऱ्यांनाही आता आवड निर्माण झाली असून, ग्रामस्थ पहाटेच योगासाठी येतात. सांबरवाडी आता ‘योगा ग्राम’ म्हणून ओळखले जात आहे.

भारताची योग शिक्षणाची परंपरा हजारो वर्षे जुनी आहे. ही परंपरा सुरुवातीच्या काळात गुरू शिष्यांपुरती मर्यादित होती. २१ व्या शतकात योग साधनेची गरज सर्वांनाच आहे, हे जगाला समजले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगाचा ठराव मांडून आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा व्हावा, अशी मागणी केली. त्याला १७७ देशांनी पाठिंबा देऊन २१ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला.

सांबरवाडी शाळेत प्रल्हाद पारटे या मुख्याध्यापकाने गावच योगा ग्राम बनवून आदर्श घालून दिला. एक वर्षापूर्वी त्यांची या गावात बदली झाली. नव्वद कुटुंबे असलेल्या या गावात पारटे यांनी प्रथम विद्यार्थी, ग्रामस्थांना विश्वासात घेतले. त्यांना योग विद्येमुळे आजारांपासून कशी मुक्ती मिळते, याची स्वत:बद्दलची सविस्तर माहिती ग्रामस्थांना पटवून दिली. त्यांनी दररोज सकाळी शाळेतच योग वर्ग सुरू केला. ग्रामस्थ व महिलाही सहभागी होऊ लागल्या.पुस्तके भेट  देऊन प्रचारत्यांचे हे कार्य वर्षापासून विना मोबदला सुरू आहे. दिवाळी व उन्हाळी सुटीतही त्यांचा योगा वर्ग सुरू असतो. गेल्या दोन वर्षांपासून योगाच्या प्रचारासाठी ते विवाह, बारसे अशा कार्यक्रमांना जाऊन नवविवाहित जोडप्यांना योगाचे पुस्तक मोफत भेट देतात. दोन वर्षांत किमान २५० पुस्तके त्यांनी मोफत भेट देऊन योगाचा प्रचार केला आहे. जागतिक योग दिनाच्या निमित्ताने साताºयात आयोजित कार्यक्रमात ते महत्त्वाची भूमिका पार पाडतात. 

मी पहिल्या दिवशी योगा शिकायला आले आणि मनाला समाधान वाटले. मला चालताना खूप त्रास व्हायचा कंबर व गुडघे खूप दुखायचे. माझे वय ७६ आहे. योगासनामुळे गुडघेदुखीचा त्रास खूप कमी झाला. माझे वजनही ७३ वरून ६४ किलो झाले आहे.- मालाबाई खाशाबा भणगे, सांबरवाडी

मी दररोज सकाळी सात वाजता सांबरवाडीत जाऊन विद्यार्थी, पालकांना योगाचे धडे देत आहे. यात गावातील अनेक युवक, युवती व प्रौढ व्यक्तींचा सहभाग असतो. योगासनामुळे शरीर सदृढ राहण्यास तर प्राणायाम ध्यान, मन विकसित करण्यास मदत करते. विद्यार्थ्यांनी योगासने केल्याने अभ्यासात प्रगती होते.- प्रल्हाद पारटे, मुख्याध्यापक सांबरवाडी 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरYogaयोग