शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा नवा निर्णय; भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
2
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
3
कॅनडाने अचानक भूमिका बदलली! अमित शाह यांच्यावर आरोप करणारा कॅनडा भारतासमोर का झुकला?
4
Asia Cup: टीम इंडियाची चिंता वाढली, अक्षर पटेलच्या डोक्याला दुखापत, IND vs PAK ला मुकणार?
5
२२ दिवसांपासून बेपत्ता, शोधूनही सापडेना! नेमकी कुठे गेली साक्षी? आईने केले गंभीर आरोप
6
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
7
असा पैसा काय कामाचा? "मी कामावर जाण्यापूर्वी रोज रडते"; ४० लाख पगार, पण समाधान नाही
8
Asia Cup: संजू सॅमसनची धमाकेदार फटकेबाजी! एका खेळीने धोनीला टाकलं मागे, केला मोठा विक्रम
9
भारताविरुद्ध युद्ध झाल्यास 'हा' देश देणार पाकिस्तानला साथ? संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ म्हणाले...
10
प्रिया मराठेच्या निधनानंतर पती शंतनू मोघेची पहिली प्रतिक्रिया; म्हणाला, "मधल्या काळात..."
11
भारत, चीन की...., कंडोमच्या वापरात कुठला देश आहे नंबर १, कुठल्या देशात आहे अधिक मागणी?
12
घरातच सूत जुळलं! काकीचा जडला पुतण्यावर जीव, ३ वर्षांपासून प्रेम; पोलीस ठाण्यातच केलं लग्न
13
ओबीसींच्या विकासासाठी योगी सरकारचा मजबूत 'प्लॅन', उचललं क्रांतिकारी पाऊल
14
ठाण्यातील अवजड वाहन बंदीचा ताप! मुंबई अहमदाबाद महामार्गावर देखील अवजड वाहनांना बंदी
15
Navratri Astro 2025: नवरात्रीत 'या' राशींवर होणार अंबाबाईची कृपा, धन-समृद्धी, आनंदाला नसेल तोटा
16
उधमपूरमध्ये काय घडलं? दहशतवाद्यांशी लढताना एक जवान शहीद, सुरक्षा दलांची मोठी कारवाई
17
काय म्हणता! इंटर्नला मिळालं महिन्याला १२.५ लाखांचं पॅकेज; अमेरिका, युरोप नाही तर मुंबईत आहे कंपनी, नाव काय?
18
बिग बजेट सिनेमांमधून दाखवला बाहेरचा रस्ता, दीपिका पादुकोणने सोडलं मौन; पोस्ट करत म्हणाली...
19
जीएसटीतील बदलानंतर स्कूटर आणि बाईकच्या किंमती १८ हजारांपर्यंत झाल्या कमी!
20
डेबिट कार्ड फी, मिनिमम बॅलन्स नसल्यास दंड आणि लेट पेमेंट चार्जेपासून होणार मुक्तता; RBI बँकांवर लगाम लावण्याच्या तयारीत

डोक्यात स्पर्धा परीक्षा, प्रवेश सायन्सला : साताऱ्यातील स्थिती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 19, 2019 23:12 IST

प्रगती जाधव-पाटील । सातारा : दहावीचे शालेय आयुष्य संपवून महाविद्यालयात भविष्यातील स्वप्ने रंगवणाºया विद्यार्थ्यांनी यंदाही विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्राकडे ...

ठळक मुद्देसंरक्षण अन् कला क्षेत्राकडेही कल वाढतोय

प्रगती जाधव-पाटील ।सातारा : दहावीचे शालेय आयुष्य संपवून महाविद्यालयात भविष्यातील स्वप्ने रंगवणाºया विद्यार्थ्यांनी यंदाही विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्राकडे जाण्याचा मार्ग चोखळला असल्याचे चित्र दिसत आहे. नोकरीची संधी आणि तेथील स्पर्धा लक्षात घेऊन उत्तम गुण मिळविणाऱ्यांच्या डोक्यात स्पर्धा परीक्षांचे उद्दिष्ट असले तरी प्रवेश मात्र विज्ञान शाखेकडे घेण्याचा कल दिसतोय.दहावीचा निकाल लागल्यानंतर आता महाविद्यालयीन प्रवेशाचे वेध विद्यार्थ्यांना लागले आहेत.

जिल्ह्यातील ७१४ माध्यमिक शाळेतील सुमारे ४२ हजार ९२० विद्यार्थ्यांनी ११५ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा दिली. यातील ४२ हजार ६३० विद्यार्थी परीक्षेस बसले आणि ३६ हजार ७६१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जिल्ह्यातून पुन:प्रविष्ट विद्यार्थ्यांची नोंदणी १ हजार ११० झाली होती.

यंदाचा निकाल लक्षात घेता नव्वद टक्क्यांच्या वर गुण मिळविणाºया विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. मुलांच्या डोक्यात स्पर्धा परीक्षांचे उद्दिष्ट असले तरी कुटुंबीयांचा कल मात्र विज्ञान आणि तंत्रज्ञान शाखेकडे आहे. ज्या विद्यार्थ्यांनी सत्तर ते ऐंशी टक्के गुण मिळविले आहेत त्यांनी वाणिज्य आणि विज्ञान या दोन पैकी एका शाखेकडे जाण्याचा विचार करत आहेत. तर सत्तर पेक्षा कमी गुण असलेली मुलं कला शाखेबरोबरच, आयटीआय, डिप्लोमा, हॉटेल मॅनेजमेंट यासारखे अल्पावधीचा कोर्स करून सेटल होण्याच्या विचारात आहेत.

विज्ञान शाखेचं मेरिट वाढणार..!गेल्या अनेक वर्षांपासून दहावीत ९० टक्के किंवा त्याहीपेक्षा अधिक गुण मिळविणारे विद्यार्थी थेट विज्ञान शाखेकडेच गेले आहेत. बारावीनंतर कोणी वैद्यकीय किंवा अभियांत्रिकीच्या वाटा चोखाळल्या आहेत. शहरात असलेली महाविद्यालये आणि यंदा ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळविलेल्या विद्यार्थ्यांच्या संख्येतील दरी मोठी आहे. त्यामुळे गतवर्षीपेक्षा विज्ञान शाखेचं मेरिट वाढणार आहे. यंदाही ९५ किंवा ९६ टक्क्यांपर्यंत मेरिट जाईल, असा कयास शिक्षणतज्ज्ञ व्यक्त करत आहेत.कला शाखेकडे वाढतोय कल!स्पर्धा परीक्षेसाठी उपयुक्त अभ्यासक्रम आणि अभ्यासासाठी मिळणारा अमाप वेळ लक्षात घेऊन काहींनी विज्ञान आणि वाणिज्य शाखेकडे दुर्लक्ष करत कला शाखेचा मार्ग चोखाळला आहे. अकरावीपासूनच अभ्यासाची तयारी करणाऱ्या या हुशार विद्यार्थ्यांनी कला शाखेकडे प्रवेश करण्याचे निश्चित केले असल्याने ९५ टक्के पडणारे विद्यार्थीही कला शाखेकडे वळण्याची शक्यता अधिक आहे. 

वाणिज्य शाखेला  यंदाही ‘अच्छे दिन’आर्थिक क्षेत्राशी संलग्न असलेल्या वाणिज्य शाखेकडे जाण्यास यंदाही विद्यार्थी इच्छुक आहेत. बँकेबरोबरच खासगी ठिकाणी उपलब्ध असलेल्या नोकरी, मनुष्यबळ, मार्केटिंग क्षेत्रात असणाºया वाढत्या संधी यांचा उहापोह करून काही विद्यार्थ्यांनी ठरवून वाणिज्य शाखेची निवड केली आहे.

माझ्या मुलीला ९२ टक्के गुण मिळाले आहेत. स्पर्धा परीक्षांच्या उद्दिष्टाबरोबरच मेडिकलचाही पर्याय तिच्यापुढे खुला आहे. त्यांच्या आवडीचे शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना बळ द्यायला प्लॅन बी तयार असायला पाहिजे. त्यानुसार आम्ही तिच्या मताचा आदर ठेवून निर्णय घेत आहोत.- दशरथ जाधव, पालक, सातारा

 

अकरावीत प्रवेश घेताना विद्यार्थ्यांपेक्षा पालक अधिक जागृत असतात. विद्यार्थ्यांचा कल लक्षात घेऊन त्यांचे समुपदेशन आणि ते निवडत असलेल्या शाखेविषयी पुरेपूर माहिती देऊन मगच विद्यार्थ्यांचा प्रवेश निश्चित करावा. यामुळे अभ्यास करताना विद्यार्थी न आवडीच्या विषयाचा ताण घेत नाहीत.- विशाल ढाणे, शिक्षक, सातारा

टॅग्स :Satara areaसातारा परिसरEducationशिक्षण