शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

घरखर्चासाठी शक्कल, युट्यूब बघून बनावट नोटा ‘छापायला’ लागला; साताऱ्यातील घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2024 11:44 IST

..अन् तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला

सातारा : पैशासाठी कोण काय करेल, याचा नेम नाही, असाच काहीसा प्रकार साताऱ्यात घडला असून, एका तरुणाने घरखर्च भागविण्यासाठी चक्क बनावट नोटा तयार केल्या. तत्पूर्वी त्याने यू ट्यूबवर माहिती घेऊन हुबेहूब नोटाही बनवल्या. मात्र, मार्केटमध्ये या नोटा खपविण्याच्या प्रयत्नात असतानाच तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला.उमेश विठ्ठल वाडकर (वय २९, रा. भैरवनाथ सोसायटी, गडकरआळी, सातारा, मूळ रा. निझरे, ता. जावळी, जि. सातारा) या तरुणाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी पकडल्यानंतर त्याचे कारनामे तपासात समोर आले. उमेश वाडकर याचे बारावीपर्यंत शिक्षण झाले आहे. काही वर्षांपूर्वी त्याने साताऱ्यात कापड दुकान सुरू केले होते. मात्र, यात त्याचे मोठे आर्थिक नुकसान झाले. हाताला काम नाही. बाहेर मित्रांसोबत दिवसभर फिरत राहायचे, असा त्याचा दिनक्रम असायचा. एके दिवशी त्याने यू ट्यूबवर बनावट नोटा कशा तयार केल्या जातात, याचा व्हिडीओ पाहिला. आपणही अशा नोटा बनवून त्या मार्केटमध्ये खपवू शकतो, याचा त्याला आत्मविश्वास आला. पण, या नोटा तयार कुठे करायच्या, असा प्रश्न त्याला पडला. त्याच्या मित्राने साताऱ्यात नवीनच लाॅज, हाॅटेल सुरू केले होते. त्या लाॅजवर जाऊन मित्राला न सांगता आपण बनावट नोटा तयार करू, असे ठरवून तो त्याच्याकडे रोज जायचा. त्या लाॅजमध्ये प्रिंटर आणि संगणक होता. या संगणकावर तो तासनतास बसायचा. मित्राला वाटायचे, त्याचे ऑनलाइन काम करतोय. पण, त्याचे भलतेच काम सुरू असायचे. एक - एक करत त्याने दोनशे रुपयांच्या हुबेहूब ९५ नोटा तयार केल्या. या बनावट पैशातून त्याने घरखर्च भागविण्याचा डाव रचला. त्याने काही नोटा पानटपरी, किराणा माल, भाजीपाला अशा ठिकाणी दिल्या असण्याची शक्यता आहे. या नोटा परत घेण्यासाठी त्याच्याकडे पोलिस कसून चाैकशी करत आहेत.

साताऱ्यातील विक्रेते चिंतेत..उमेश वाडकर याने पानटपरी, भाजीविक्रेते, किराणा माल या ठिकाणी या बनावट नोटा खपविल्या असल्याची शक्यता आहे. दोन ते चार रुपये प्रत्येक वस्तूमागे या व्यावसायिकांना कमिशन मिळत असते. परंतु, या बनावट नोटांमुळे दिवसभरात कमावलेली कमाई त्यांची पाण्यात जाऊ शकते. साताऱ्यातील काही विक्रेते आपल्याजवळ असलेल्या नोटा खऱ्या आहेत का, हे तपासून पाहू लागले आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस