मारूल तर्फ पाटणमध्ये गॅस्ट्रोमुळे हाहाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:36 IST2021-03-24T04:36:53+5:302021-03-24T04:36:53+5:30

दरम्यान, आरोग्य विभागाचे पथक गावात दोन दिवसांपासून ठिय्या मांडून आहे. सर्व परिस्थितीवर आरोग्य विभागाचे लक्ष आहे. गटविकास अधिकारी मीना ...

Harokar due to gastro in Patan towards Marul | मारूल तर्फ पाटणमध्ये गॅस्ट्रोमुळे हाहाकार

मारूल तर्फ पाटणमध्ये गॅस्ट्रोमुळे हाहाकार

दरम्यान, आरोग्य विभागाचे पथक गावात दोन दिवसांपासून ठिय्या मांडून आहे. सर्व परिस्थितीवर आरोग्य विभागाचे लक्ष आहे. गटविकास अधिकारी मीना साळुंखे, आरोग्य अधिकारी बी. आर. पाटील यांच्यासह पंचायत समितीचे सदस्य बबनराव कांबळे यांनी गावाला भेट देऊन अधिकाऱ्यांना सूचना केल्या.

पाटण तालुक्यातील मारूल तर्फ पाटण येथे गत दोन दिवसांपासून ग्रामस्थांना उलट्या व जुलाबाचा त्रास होऊ लागला. याबाबतची महिती ग्रामस्थांनी पंचायत समिती सदस्य बबनराव कांबळे यांना दिल्यानंतर त्यांनी तत्काळ गावाला भेट देऊन पाहणी केल्यावर दूषित पाण्यामुळे गावात गॅस्ट्रोची साथ पसरल्याचे त्यांच्या लक्षात आले. बबनराव कांबळे यांनी तातडीने गटविकास अधिकारी मीना साळुंखे यांच्याशी संपर्क साधून आरोग्य विभागाला याची कल्पना दिली. त्यानंतर आरोग्य विभागाचे पथक गावात दाखल झाले. उपकेंद्रात ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करण्यात आली. काही रुग्णांना उपकेंद्रात आणि घरामध्ये उपचार सुरू करण्यात आले आहेत.

दरम्यान, शनिवारी शेळके वस्तीजवळील सुतार वस्तीमधील जान्हवी लोहार या पाच वर्षांच्या बालिकेला उलट्या व जुलाबाचा त्रास होऊ लागल्याने तिला पाटण येथील खासगी दवाखान्यात आणण्यात आले होते. येथील डॉक्टरांनी तिला पुढील उपचारार्थ कऱ्हाडात नेण्यास सांगितले होते. मात्र कुटुंबीयांनी तिला परत गावाला नेले. त्यानंतर रविवारी सकाळी पुन्हा जान्हवीला उलट्या व जुलाबाचा त्रास होऊ लागल्याने तिला कऱ्हाडला नेत असताना वाटेतच तिचा दुर्दैवी मृत्यू झाला.

गटविकास अधिकारी मीना साळुंखे व तालुका वैद्यकीय अधिकारी आर. बी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हेळवाक प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी सुप्रीम कांबळे, प्रफुल्लकांत कांबळे, आरोग्य साहाय्यक जी. एस. धुमाळ, आरोग्यसेवक सुभाष धामोडे, ताहीर डांगे, अनिरुद्ध कोरडे, आरोग्यसेविका पार्वती माने, प्रतीक्षा पेंढारी, मुसा चाफेरकर, आरोग्य विस्तार अधिकारी टी. बी. पाटील हे पथक गावात तळ ठोकून आहे.

- चौकट

पाईपलाईनला गळती लागल्याचे स्पष्ट

मारूल तर्फ पाटण गावात घरोघरी जाऊन अंगणवाडी सेविका व ‘आशां’मार्फत सर्व्हे करण्याचे काम सुरू आहे. गावात साथ का उद्भवली याची शहानिशा करण्यासाठी पाटण येथील पाणीपुरवठा विभागाचे अधिकारी उपअभियंता एस. आर. कदम व शाखा अभियंता एम. बी. पाटील यांनी पिण्याच्या पाण्याच्या योजनेची तपासणी केली. यात पाईपलाईनला काही ठिकाणी गळती लागल्याचे निदर्शनास आले आहे.

फोटो : २३केआरडी०२

कॅप्शन : मारूल तर्फ पाटण येथे गॅस्ट्रोची साथ पसरली असून रुग्णांवर आरोग्य केंद्र तसेच घरात उपचार सुरू करण्यात आले आहेत.

Web Title: Harokar due to gastro in Patan towards Marul

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.