‘भुपाळी ते भैरवी’त सखी दंग
By Admin | Updated: December 16, 2014 00:18 IST2014-12-15T21:10:53+5:302014-12-16T00:18:53+5:30
हाऊसफुल्ल : ग्रामजीवनात ओवी, भारुड, गवळण, वासुदेव, हेळवी सादर

‘भुपाळी ते भैरवी’त सखी दंग
सातारा : ‘लोकमत सखी मंच’ आयोजित ‘भुपाळी ते भैरवी’ या कार्यक्रमात सखींना लोकसंस्कृतीचे दर्शन घडले. कलाकारांनी ओवी, भारुड, भुपाळी, गवळण, वासुदेव, हेळवी, मरिआईचा गाडा, बहुरूपी अशी ग्रामजीवनातील विविध रूपे सादर करीत सखींची दाद मिळविली.
येथील शाहू कला मंदिरमधील या कार्यक्रमाचे उद्घाटन जिजाऊ प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सिद्धी पवार यांच्या हस्ते ‘लोकमत’चे संस्थापक दिवंगत जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून व दीपप्रज्वलनाने झाले. यावेळी किरण लाहोटी, संपत कदम, कृष्णात पाटोळे आदी उपस्थित होते.
पहिल्यांदा भुपाळी सादर करण्यात आली. पूर्वीच्या काळी जात्यावर धान्य दळण्यात येत होते. पहाटेच्या सुमारास घरोघरी जात्यावर धान्य दळताना ओव्या म्हणायच्या. याचेही दर्शन या ओवीतून झाले. पहाटे हातात कंदिल घेऊन कुडमुड वाजवत येणारा पिंगळा जोशी कशा प्रकारे बोलतो. त्याला पक्ष्यांची भाषा कशी समजते, हे दाखविण्यात आले. तसेच १८ पिढ्यांचा इतिहास सांगणारा हेळवी, सकाळच्या सुमारासच येणारा वासुदेव यांच्या सोबत मरिआईचा गाडा, लावणी, धनगरी गीतही सादर करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सादरीेकरण निर्माते प्रमुख संपत कदम, सूत्रधार कृष्णात पाटोळे, मिलिंद कांबळे, महेश नवाळे, नरेंद्र हराळे, कुणाल मसाले, सिकंदर पीरजादे, हेमंत थोरात, अभिजित कदम, प्रा. जयश्री कदम, रोहिणी आढाव, वैष्णवी जाधव, वर्षा जाधव, अबोली कदम, अवधुत माने, संजय घोलप यांनी केले.
चंदुकाका सराफ यांच्यातर्फे काढण्यात आलेल्या लकी ड्रॉमध्ये सुवर्णनथच्या मानकरी मीना झाड या ठरल्या. यावेळी वरद फर्निशिंगतर्फे दोन कर्टन सेट, लाहोटी कलेक्शनतर्फे तीन साड्या, इम्प्रेशन ब्युटी पार्लरतर्फे पाच फेशियल, समन्वय लॅग्वेंज स्कूलतर्फे तीन स्पोकन इंग्श्लि कोर्सचा लकी ड्रॉ काढण्यात आला.
सर्व विजेत्यांना लाहोटी कलेक्शनच्या किरण लाहोटी व सिद्धी पवार यांच्या हस्ते बक्षिसे देण्यात आली. (प्रतिनिधी)
‘भुपाळी ते भैरवी’ या कार्यक्रमाचे प्रायोजकत्व नामांकित आयुर्वेदाचार्य डॉ. सुयोग दांडेकर यांच्या प्रकृती आयुर्वेदिक हेल्थ रिसॉर्ट आणि जिजाऊ प्रतिष्ठानच्या अध्यक्षा सिद्धी पवार यांनी स्वीकारले होते.