शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

‘ती’च्या हातून आजवर सहा हजार शवविच्छेदन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 11, 2018 20:16 IST

ज्या क्षेत्रात काम करण्यासाठी पुरुषांचाही थरकाप उडतो, अशा शवविच्छेदन क्षेत्रात आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटविला आहे भोर येथील शीतल रामलाल चव्हाण या युवतीने. विशेष म्हणजे वयाच्या सहाव्या वर्षांपासून ती या क्षेत्रात

ज्या क्षेत्रात काम करण्यासाठी पुरुषांचाही थरकाप उडतो, अशा शवविच्छेदन क्षेत्रात आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटविला आहे भोर येथील शीतल रामलाल चव्हाण या युवतीने. विशेष म्हणजे वयाच्या सहाव्या वर्षांपासून ती या क्षेत्रात कार्यरत असून, शीतलने आतापर्यंत सहा हजारांहून अधिक मृतदेहांचे शवविच्छेदन केले आहे.

मृत्यू अटळ आहे. परंतु मृत्यू जर अनैसर्गिक असल्याचा संशय असल्यास तो कशाप्रकारे झाला, हे जाणून घेण्यासाठी कायदेशीर प्रक्रियेतून जावे लागते. यामध्ये सर्वात महत्त्वाचा व कायदेशीर प्रकार म्हणजे शवविच्छेदन. शवविच्छेदन करायचे म्हटले की पुरुषही द्र्रव्यरूपी प्रसाद घेतल्याशिवाय कामास तयार होत नाही; पण असे असतानाही अवघ्या वयाच्या सहाव्या वर्षी वडिलांसोबत शवविच्छेदन करण्याकरिता मदतीसाठी जाणाऱ्या शीतल चव्हाण हिने नोकरीचा हाच मार्ग निवडला. सध्या पुणे जिल्ह्यातील भोर येथील उपजिल्हा रुग्णालयामध्ये सफाई कामगार म्हणून कार्यरत असलेल्या शीतलने वडिलांच्या निधनानंतर वयाच्या बाराव्या वर्षी शवविच्छेदनाचे काम करून कुटुंबाचा चरितार्थ सुरू केला.

आज वीस ते पंचवीस वर्षांचा काळ लोटला तरी शीतलचे हे काम अवितरपणे सुरू आहे. एकदा या क्षेत्रात उतरल्यानंतर त्याचे कौशल्य आत्मसात करणे गरजेचे असते. परंतु शीतलने वयाच्या सहाव्या वर्षीच वडिलांकडून याचे धडे घेतले होते.आजवर तिने सहा हजारांहून अधिक मृतदेहांचे शवविच्छेदन करत अनोखा विक्रम रचला आहे. शीतलला तिच्या बहिणी गुड्डी, सुप्रिया व लहान भाऊ रोहन हे शवविच्छेदनसाठी मदत करतात.

शवविच्छेदन करणाºया शीतल चव्हाण यांच्या जीवनावर लघुपट बनविण्यात आला आहे. राज्याला हादरवून सोडणाºया मांढरदेव येथील दुर्घटना, भाटघर धरणातील होडी उलटून झालेली दुर्घटना यासारख्या अनेक घटनांची साक्षीदार होत शीतलने मृतदेहांच्या शवविच्छेदनाची प्रक्रिया पूर्ण केली आहे.अनेक पुरस्कारांनी गौरवशीतलने आजवर केलेल्या कामाची पोचपावती म्हणून शासनाने तसेच विविध समाजसेवी संस्थांनी डॉ. आनंदीबाई जोशी पुरस्कार, झाशीची राणी पुरस्कार, सावित्री समता पुरस्कार, दुर्गामाता पुरस्कार असे विविध मानाचे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. नुकताच तिला पुणे येथील आबा बागुल प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा प्रतिष्ठेचा ‘तेजस्विनी पुरस्कार’ जाहीर झाला आहे. शवविच्छेदनासारख्या क्षेत्रातही आपल्या कार्यकतृत्वाचा आगळा-वेगळा ठसा उमटविणाºया अन् शवविच्छेदन कन्या म्हणून प्रसिद्ध असलेल्या शीतल चव्हाण या नवदुर्गेच्या कार्याला सलामच करावा लागेल.शवविच्छेदनसारख्या क्षेत्रामध्ये स्त्री म्हणून कार्य करणे आजच्या समाजाच्या दृष्टीने अवघड आहे. पुरुषांचे वर्चस्व असलेल्या क्षेत्रामध्ये स्त्रियांनी मक्तेदारी निर्माण केल्यास एक आगळावेगळा विक्रम घडत असतो. चुलीच्या पलीकडेही एक आव्हान आहे, हे जाणून कार्यरत राहिल्याने व यामधून समाजाची सेवा घडत आहे.- गुड्डी चव्हाण, बहीण.

समाजामध्ये वावरत असताना अनेक संकटांना सामोरे जावे लागते. वयाच्या सहाव्या वर्षांपासून शवविच्छेदन क्षेत्रात कार्यरत आहे. कुटुंबीय व नागरिकांच्या सहकार्याशिवाय या क्षेत्रात काम करणे कठीण आहे. संकटांनी कणखर बनत गेले, काम हेच आपले कर्तव्य आहे, हे जाणल्याने या क्षेत्रात नावलौकिक मिळवता आला.- शीतल चव्हाण.

टॅग्स :Navratriनवरात्रीSatara areaसातारा परिसर