शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता: 'तो' बलात्कार होता तर आरोपीच्या अंगावर 'लव्ह बाईट्स' कसे? वकिलाचा धक्कादायक सवाल
2
५ जुलैच्या ठाकरे बंधूंच्या विजयी सभेत सहभागी होणार का? काँग्रेस नेत्यांचे सूचक विधान, म्हणाले...
3
३ कोटी २० लाख सरकारी निधी हडपण्याचा डाव उघड; आमदार प्रसाद लाड यांचा खळबळजनक आरोप
4
'धनुष्य बाण' कुणाचा, उद्धवसेना की शिंदेसेना? १६ जुलैला 'सुप्रीम' सुनावणी
5
अवघी दिल्ली एवढी लोकसंख्या, तरीही भारताच्या दृष्टीने 'घाना' देश महत्त्वाचा! कारण तरी काय?
6
सोन्याच्या दरात मोठी घसरण, चांदीची चमकही झाली कमी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवी किंमत
7
पवार काका-पुतण्यांना दे धक्का; NCP च्या दोन्ही गटातील दिग्गज नेत्यांचा भाजपामध्ये प्रवेश
8
Apoorva Mukhija : "मी सिंगल आहे, मला आता लग्न करायचंय; बॉयफ्रेंड शोधतेय, प्लीज कोणीतरी..."
9
Viral Video : हत्तीचं पिल्लू इवल्याशा बेडकाला घाबरलं; क्यूटनेस व्हिडीओनं नेटकऱ्यांचं मन जिंकलं!
10
जे कुणाला जमलं नाही ते टीम इंडियानं करून दाखवलं; इंग्लंडच्या मैदानात रचला इतिहास
11
कशापाई तू वारी हट्ट केलास रे बाळा.. आता मी घरी एकटीच जाऊ का; गोविंदासाठी आजीने फोडला हंबरडा
12
Chanakyaniti: चाणक्यनीतीनुसार तरुणपणी केलेल्या 'या' तीन चुका म्हातारपणी भोवतात!
13
IND W vs ENG: स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा टी२० क्रिकेटमधील सुपरहिट जोडी, रचला नवा इतिहास!
14
'एक दिवसाचा पंतप्रधान'! आशिया खंडातील देशात उद्भवला बाका प्रसंग, 'नायक' सिनेमा आठवेल...
15
नाशिकमध्ये पतीविरोधात बलात्काराचा गुन्हा, पत्नीने बाळाला जन्म दिल्यानंतर समोर आले प्रकरण
16
"पप्पा, मला पावसात खेळायचंय"; १० वर्षांच्या लेकाचा हट्ट अन् हैवान झाला बाप, घेतला जीव
17
"सर्वाधिक पोलीसमृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने"; विरोधी पक्षनेते दानवेंनी मांडली आकडेवारी
18
'मीच मुख्यमंत्री राहणार', सिद्धारमय्या यांची स्पष्टोक्ती; डीके शिवकुमार म्हणाले...
19
स्वप्नांना पंख मिळाले! कठोर परिश्रमाने घातली आकाशाला गवसणी; आता नौदलात होणार अधिकारी
20
भारताचे पहिले अंतराळवीर राकेश शर्मा राहतात प्रसिद्धीपासून दूर, ते सध्या आहेत कुठे? करतात काय? जाणून घ्या

दीड कोटींचा अपंग निधी तांत्रिक अडचणीत!

By admin | Updated: October 29, 2014 00:09 IST

दोन वेळा पत्रव्यवहार : अपंग कल्याण आयुक्त-अधिकारी यांच्या कागदी घोड्यापुढे निर्णयप्रणाली पंगू

जगदीश कोष्टी - सातारा  -अपंगांचे जीवन सुसह्य व्हावे, त्यांना स्वत:च्या पायावर उभे राहून कुटुंबाचा चरित्रार्थ भागविता यावा, यासाठी जिल्हा परिषदेतील समाज कल्याण विभागातर्फे विविध योजना राबविल्या जातात. त्यासाठी लाभार्थ्यांना विविध वस्तूंचे वाटप केले जाते. यासाठी दीड कोटींचा निधी मंजूर झाला आहे. मात्र, तांत्रिक मंजुरीस विलंब लागत असल्याने खरे लाभार्थी योजनेपासून वंचित राहत आहेत.सातारा जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागातर्फे जिल्ह्यातील अपंगासाठी विविध योजना राबविल्या जातात. यामध्ये लाभार्थ्यांना झेरॉक्स मशिन, कडबाकुटी यंत्र, तीन, चार चाकी स्कूटर तसेच घर बांधण्यासाठी अनुदान दिले जाते. यासंदर्भात समाजकल्याण समितीने जुलैमध्ये सभा घेऊन २०१४-१५ या वर्षांसाठी जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत शिफारस करण्यात आली होती. त्यानुसार २६ जुन रोजीच्या जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत या योजना राबविण्यासाठी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीला अधिकार दिले होते. जिल्हा परिषदेच्या पुरवणी अंदाजपत्रकात अपंगांसाठीच्या योजनसाठी १ कोटी, ६५ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली होती. यामध्ये झेरॉक्स मशिनसाठी चाळीस लाख, कडबाकुटीसाठी २५ लाख, तीन, चारचाकी स्कूटरसाठी वीस लाख, घरकुल योजनेसाठी ८० लाखांची तरतूद केली होती. ही योजना नव्याने राबविली असल्याने त्याच्या अंमलबजावणीसाठी तांत्रिक मान्यता घेण्यासाठी पुणे येथील अपंग कल्याणचे आयुक्तांकडे प्रस्ताव पाठविला होता. मात्र, आयुक्तांकडून कोणतीच मंजुरी मिळाली नाही. त्यानंतर जिल्हा परिषदेने १६ आॅक्टोबरला पुन्हा स्मरणपत्र पाठविले आहे. आयुक्ताच्या मंजुरीची प्रतीक्षा अधिकारी, कर्मचारी करत आहेत. तर खरे लाभार्थी हेलपाटे मारत आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांतून नाराजी व्यक्त होत आहे. लाभार्थ्यांची होणार फरफटअपंगासाठी राबविलेल्या योजनेचा निधी मार्चपर्यंत संपविणे आवश्यक आहे. आॅक्टोबर महिना संपत आला तरी तांत्रिक मंजूरीच्या घोळात योजना अडकली आहे. मंजूरी मिळाली तरी लाभार्थ्यांना लगेच लाभ घेता येणार नाही. त्यासाठी विविध दाखल्यांसाठी वेळ जाणार आहे. यामध्ये खरे लाभार्थी मात्र भरडले जात आहेत,’ अशी खंत सामाजिक कार्यकर्ते महारुद्र तिकुंडे यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केली.अपंग कल्याण योजनेंतर्गत विविध वस्तूंसाठी १ कोटी ६५ लाखांची तरतूद झाली आहे. मात्र, त्याला आयुक्तांकडून तांत्रिक मंजूरी मिळालेली नाही. ती मिळावी म्हणून आम्ही पुन्हा पाठपुरावा करणार आहोत. - स्वाती इथापे,जिल्हा समाज कल्याण अधिकारी, सातारा