शहरं
Join us  
Trending Stories
1
"हरलेल्यांनी अटी घालायच्या नसतात..."; ट्रम्पचा शस्त्रसंधी वाढवण्याचा निर्णय इराणने धुडकावला
2
India-China Big Tension: इराण युद्ध… कच्च्या तेलानं बिघडवला खेळ; भारत-चीनला झटका, आली 'ही' वाईट बातमी
3
Government Employees Strike: मंत्रालयातील निम्मे कर्मचारी संपावर, कामकाजावर मोठा परिणाम
4
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
5
मुंबई फिरायला आलेली चिमुरडी गर्दीत हरवली, पोलिसांनी झटपट पावले उचलली; पालकांकडे सुखरूप सोपवले
6
गुरुपुष्यामृत २०२६: स्वामी-लक्ष्मी-शनि दोन्ही हातांनी भरघोस देतील, ३ गोष्टी करा; पुण्य-लाभ!
7
Mumbai University: Mumbai University: मुंबई विद्यापीठाच्या टी.वाय. बी.कॉम.च्या तीन विषयांच्या प्रश्नपत्रिका फुटल्या
8
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
9
Unseasonal Rain: राज्यात शुक्रवारपर्यंत वादळी वारे, गारपीट अन् पावसाची शक्यता, नागरिकांसाठी सूचना
10
आयटी कंपन्यांमधील कामगार हिताच्या उपाय योजनांकरिता अभ्यास गट गठीत करा, कामगार मंत्र्यांचे आदेश  
11
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
12
Donald Trump: "करार करा, अन्यथा बॉम्ब टाकू" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला अखेरचा इशारा
13
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
14
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
15
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
16
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
17
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
18
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
19
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
20
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
Daily Top 2Weekly Top 5

भुयाचीवाडीत जुन्या आठवणीला सलाम!

By admin | Updated: February 9, 2015 00:48 IST

युवा सरपंचाचा उपक्रम : स्वातंत्र्यानंतरचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, निवृत्त अधिकारी व वारसांचा गौरव

उंब्रज : जुन्या मंडळींचा अनेकांना अडथळा व्हायला लागतो... घर, गावचा कारभार आतातरी आम्हाला करू द्या... तुम्ही शांत देव-देव करत बसा..., असं नव्या पिढीला वाटत असतं. हे चित्र नेहमीच पाहायला मिळते. मात्र, कऱ्हाड तालुक्यातील भुयाचीवाडी याला अपवाद ठरले. भुयाचीवाडीचे युवा सरपंच संजय कदम यांनी जुन्यांच्या आठवणीला, कर्तृत्वाला समाल करणारा गौरवशाली कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यामध्ये ९२ वृद्ध या सत्काराने गहिवरून आले होते.भविष्याकडे वाटचाल करत असताना पाठीमागील घटना व्यक्ती विसरता कामा नये, पाठीमागील पिढीचा आदर्श मार्गदर्शन यावर भावीपिढीला वाटचाल करताना अडथळे, अडचणी कमी येतात. यासाठी भुयाचीवाडी येथील सरपंच संजय कदम यांनी स्वातंत्र्यानंतरचे गावातील जे लोक सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, शासकीय नोकरीतून निवृत्त झालेले अधिकारी व कर्मचारी तसेच मृतांच्या वारसांचा सत्कार केला. यावेळी झालेल्या सत्कारामुळे ९२ वृद्धांना गहिवरून आले.पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गालगत वसलेले भुयाचीवाडीला १९७६ च्या पुराचा फटका बसला. यामुळे कृष्णाकाठावरून स्थलांतरित होऊन महामार्गालगत पुनर्वसित झालेले हे गाव. गावातील निम्म्याहून अधिक कुटुंबे मासेमारी करून उपजीविका भागवितात. सरपंच कदम यांनी ग्रामपंचायतीची स्थापन झाल्यापासून आजपर्यंतचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्यांचा सत्कार केला. जे मयत झाले त्यांच्या वारसांचाही सत्कार केला. याचवेळी गावातील दोन स्वातंत्रसैनिकांच्या पत्नी, सेवानिवृत्त शिक्षक, सरकारी कर्मचारी यांचाही गौरव केला.अचानक आयोजन केलेल्या या कार्यक्रमामुळे सर्वांनाच सुखद धक्का बसला. त्यातील अनेकजण सुखावले होते. हे त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट जाणवत होते. (प्रतिनिधी)ग्रामपंचायतीची स्थापना १९७२ मध्ये झाली. यामधील पहिल्या कार्यकाळातीळ ग्रामपंचायत सदस्य वसंत राजाराम भोकरे हे ८४ वर्षीय सत्कारासाठी पिशवीसह कार्यक्रमाला हजर होते. यावरून या सत्काराचे महत्त्व किती होते हे सर्वांना समजले.संपूर्ण कार्यक्रम झाला. यावेळी सेवानिवृत्त पोलीस कर्मचारी विश्वास शिंदे यांच्या लक्षात आले की, विद्यमान सरपंच यापूर्वीही सरपंच होते. त्यांचाच सत्कार राहिला आहे. त्यांनी त्यांचा सत्कार गावातील सर्वांच्या वतीने केला.