शहरं
Join us  
Trending Stories
1
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
2
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
3
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
4
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
5
पाच टप्पे, ‘चौसष्टी’च्या फेऱ्यात; राजकारण ढवळले, प्रचारसभांतील आरोप-प्रत्यारोपांना मिळाला पूर्णविराम
6
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास
7
केजरीवाल यांचे माजी पीए बिभव कुमार अखेर अटकेत; स्वाती सहज बाहेर पडल्या, ‘आप’ने जारी केला व्हिडीओ 
8
प्रचारतोफा शांत; राज्यात उद्या अखेरच्या टप्प्यातील मतदान; देशातील ८ राज्यांतील ४९ मतदारसंघांत लढत
9
आता भाजप सक्षम, सगळे निर्णय स्वबळावर; रा.स्व. संघाची मदत घेण्याबाबत जे.पी.नड्डा यांचे मत
10
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
11
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
12
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
13
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
14
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
15
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
16
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
17
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
18
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
19
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
20
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  

नकार पचविण्याची सवय... अच्छी हैं ! : तरुणांना मार्गदर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 07, 2020 1:14 AM

साता-यातील विवेकवाहिनीच्या माध्यमातून तरुणाईला दोन दशकांपासून विविध स्तरांवर येणारे अपयश आणि नकार पचविण्यासाठी प्रशिक्षित दिले जात आहे. विवेक वाहिनीच्यावतीने जोडीदाराची विवेकी निवड या उपक्रमांतर्गत नकार पचविण्याचे शिकविले जाते. महिलांनाही नकार देण्याचा अधिकार आहे,

ठळक मुद्दे विवेकवाहिनीचा उपक्रम --या पार्श्वभूमीवर साताऱ्यात गेल्या अनेक वर्षांपासून विवेकवाहिनी तरुणांना नकार पचविण्याचे प्रशिक्षण देत आहे.त्यामुळे तरुण-तरुणी दोघांनीही स्पष्ट नाही म्हणायला आणि नकार पचवायला शिकलं पाहिजे.

प्रगती जाधव-पाटील।सातारा : नागपूर येथील शिक्षिकेवर किंवा मुंबईत तरुणीवर झालेला अ‍ॅसिड हल्ला हा एकतर्फी प्रेमापेक्षाही नकार पचवू न शकलेल्या पुरुषाने महिलेवर केलेला हल्ला असंच म्हणावं लागेल. नकार ऐकण्याची आणि तो पचविण्याची क्षमता कमी होत असल्याने अ‍ॅसिड हल्ल्याचे विकृत प्रयोग होत आहेत. या पार्श्वभूमीवर साताऱ्यात गेल्या अनेक वर्षांपासून विवेकवाहिनी तरुणांना नकार पचविण्याचे प्रशिक्षण देत आहे.

साता-यातील विवेकवाहिनीच्या माध्यमातून तरुणाईला दोन दशकांपासून विविध स्तरांवर येणारे अपयश आणि नकार पचविण्यासाठी प्रशिक्षित दिले जात आहे. विवेक वाहिनीच्यावतीने जोडीदाराची विवेकी निवड या उपक्रमांतर्गत नकार पचविण्याचे शिकविले जाते. महिलांनाही नकार देण्याचा अधिकार आहे, त्यामुळे त्यांच्या मताचा सन्मान करायला शिका, असं वारंवार तरुणांच्या मनावर बिंबविले जात आहे.

भविष्यात हे हल्ले होऊ नयेत, यासाठी तरुणांबरोबरच तरुणींनाच सक्षम आणि स्पष्टपणे मत मांडण्यासाठी आग्रही राहण्याचे शिकविले पाहिजे. यासाठी हे प्रशिक्षण दिले जात असल्यामुळे कोणत्याही प्रकारच्या अनुचित घटना घडणार नाहीत. या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

स्पष्ट नाही म्हणायला शिका !मोबाईल नंबर मिळवून त्याद्वारे चॅटिंग आणि पुढं डेटिंग हा तरुणाईचा फंडा होऊ पाहत आहे. मुळातच एखाद्याविषयी शंका असेल तर त्यांच्याशी संवाद टाळणं उत्तम; पण अनेकदा स्पष्टपणे नाही म्हणण्याचं धाडस होत नसल्यामुळे नात्यात गोंधळ सुरू होतो. तरुण प्रेमाच्या हिशेबाने बोलत असतो तर तरुणी मैत्रीच्या रुपात उत्तरे देत असती. एखाद्या प्रश्नाच्या किंवा मिळालेल्या उत्तराच्या बाबत काहीही शंका वाटली तर स्पष्टपणे त्यांचे निरसन होणे आवश्यक आहे. ते नाही झालं तर क्लिष्टता वाढत जाते. त्यामुळे तरुण-तरुणी दोघांनीही स्पष्ट नाही म्हणायला आणि नकार पचवायला शिकलं पाहिजे.

संयुक्त कुटुंबांचा फायदामोठ्या शहरांमध्ये न्युक्लिअर कुटुंब वास्तव्यास आहेत. त्यामुळे पालकांचा आणि पाल्यांचा संवाद अल्प झालाय. आधुनिक गॅझेटमुळं जग जवळ आणि माणसं दुरावली गेलीत. ही अवस्था छोट्या शहरांमध्ये दिसत नाही. परिणामी मनात येणाऱ्या भावनांविषयी स्पष्टपणे बोलायला हक्काचा चुलत, मावस, बहीण भाऊ असतात. सर्वात महत्त्वाचं म्हणजे बाहेर काहीही गडबडी करून आलेल्यांच्या चेहºयावरील हावभाव ओळखणारी पारखी नजर घराघरांमध्ये असते. आजी-आजोबांना काय केलं हे नाही कळत; पण काहीतरी झालंय ते तरी नक्कीच कळतं. महानगरांमध्ये ही पिकलेली पानं नसतात.

म्हणून साताऱ्यात  प्रमाण कमीसातारा जिल्हा आकाराच्या आणि लोकसंख्या घनतेच्या मानाने आकाराने लहान असा जिल्हा आहे. इथं पावलोपावली कोणीतरी ओळखीचा, पाहुणा, मित्र असे भेटत राहतात. शहर व परिसराची हद्द अतिविस्तीर्ण नसल्यामुळे येथे प्राणघातक हल्ला करण्याला तरुणाई धजत नाही. उलटपक्षी अनैतिक संबंधांतून खून करणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे; पण तरुणीवर प्राणघातक हल्ला करून तिचं विद्रुपीकरण करण्याचा प्रयत्न साता-यात झाला नाही.

 

महिलांना मालमत्ता समजायची आणि तिने नकार दिला तर तिला इजा पोहोचविण्याच्या मानसिकतेतून हे अ‍ॅसिड हल्ले होतात. विवेकवाहिनी विविध स्तरांवर तरुणांना याविषयी मार्गदर्शन करून ‘नकाराचा अर्थ नकारच असतो,’ हे तरुणांना समजावून सांगते. परिणामी मुलांमध्ये नकार पचविण्याची तयारी निर्माण होते.- डॉ. हमीद दाभोलकर, मानसोपचारतज्ज्ञ, सातारा

टॅग्स :Satara areaसातारा परिसरsexual harassmentलैंगिक छळ