शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

LokSabha 2024: पाडव्याचा मुहूर्त हुकणार; धाडसावरच माढ्याचा तिढा सुटणार, राष्ट्रवादी उमेदवाराची प्रतीक्षाच 

By नितीन काळेल | Updated: April 8, 2024 18:26 IST

अनिकेत देशमुखही तयारीत ?

सातारा : महायुतीतील इच्छुक अजून स्वघरीच असल्याने राष्ट्रवादी काँग्रेसचा माढ्याचा उमेदवार जाहीर करण्याचा गुढीपाडव्याचा मुहूर्तही हुकणार आहे. स्वपक्षातून बाहेर पडण्याचे धाडस संबंधित दाखवत नाहीत तोपर्यंत शरद पवार गटाचाही उमेदवार ठरणार नाही. त्यामुळे माढ्याचा तिढा वाढतोय की काय? अशी शंका व्यक्त होत आहे.

माढ्यात भाजपने उमेदवार जाहीर करून १५ दिवस लोटले आहेत. पक्षाने पुन्हा खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांना उमेदवारी दिली. त्यामुळे त्यांनी गावभेटी, मेळावे सुरू केले आहेत. पण त्यांना महायुतीमधील आणि राजकारणातील मोहिते-पाटील आणि रामराजे नाईक-निंबाळकर या दोन मातब्बर घराण्याचा विरोध आहे. यासाठी दोन्ही घराण्यातील प्रमुखांच्या अनेक भेटीही झाल्या आहेत. त्यातून राष्ट्रवादीच्या शरद  पवार गटात जाऊन उमेदवारी घेण्याचा पर्याय पुढे आला आहे. पण त्याची अंमलबजावणी झालेलीच नाही.मात्र,भाजपचे सोलापूर जिल्हा संघटक धैर्यशील मोहिते-पाटील यांच्या हाती तुतारी देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. यासाठी शरद पवार यांच्याबरोबर धैर्यशील यांची भेटही झाली. मात्र, धैर्यशील हे अजून भाजपमध्येच आहेत. त्यांनी पक्षातून बाहेर पडण्याचे धाडस दाखविले तरच ते पवार गटाचे उमेदवार असू शकतात.रामराजे आणि मोहिते-पाटील यांच्या आतापर्यंतच्या बैठकीत राष्ट्रवादीची उमेदवारी घेण्याबाबत पहिल्या क्रमांकावर धैर्यशील यांचे, तर दुसऱ्या क्रमांकावर रामराजेंचे बंधू संजीवराजे यांचे नाव आहे. धैर्यशील तुतारी हाती घेणार नसतील तर संजीवराजे नाईक-निंबाळकर उमेदवारीचे आव्हान पेलणार का? हाही प्रश्न आहे. यासाठी रामराजेंचा होकार महत्त्वाचा आहे.

भाजपचे चिन्ह अन् शुभेच्छा !मोहिते-पाटील लवकरच शरद पवार गटात प्रवेश करतील, असे त्यांचे कार्यकर्ते सांगत आहेत. तर आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी नुकत्याच भाजप कार्यकर्त्यांना स्थापना दिनाच्या शुभेच्छा दिल्या. धैर्यशील मोहिते यांच्या सोशल मीडिया हॅँडल्सवर भाजपचे चिन्ह आणि संदेश कायम दिसून येत आहे. त्यामुळे मोहिते-पाटील काय निर्णय घेणार, हे अजूनही स्पष्ट नाही.

अनिकेत देशमुखही तयारीत ?सांगोला तालुक्यातील व माजी आमदार दिवंगत गणपतराव देशमुख यांचे नातू डाॅ. अनिकेत देशमुख हेही माढ्यातून लढण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळत आहे. यासाठी त्यांनी शरद पवार यांचीही भेट घेतली. त्यामुळे माढ्यात शरद पवार हे कोणती खेळी खेळणार, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरmadha-acमाढाSharad Pawarशरद पवारBJPभाजपा