धरणग्रस्तांची आंदोलनस्थळी गुढी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 04:47 IST2018-03-19T04:47:44+5:302018-03-19T04:47:44+5:30
कोयना धरणग्रस्तांनी दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे रविवारी गुढीपाडवा कोयनानगर येथील आंदोलनस्थळीच साजरा केला. या वेळी श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी पत्नीसह आंदोलकांनी उभारलेल्या गुढीचे पूजन केले.

धरणग्रस्तांची आंदोलनस्थळी गुढी
कोयनानगर (जि. सातारा) : कोयना धरणग्रस्तांनी दिलेल्या इशाऱ्याप्रमाणे रविवारी गुढीपाडवा कोयनानगर येथील आंदोलनस्थळीच साजरा केला. या वेळी श्रमिक मुक्ती दलाचे अध्यक्ष डॉ. भारत पाटणकर यांनी पत्नीसह आंदोलकांनी उभारलेल्या गुढीचे पूजन केले.
‘मुख्यमंत्र्यांकडून आलेले बैठकीचे निमंत्रण हा प्रकल्पग्रस्तांच्या एकीचा आणि संघटित शक्तीचा विजय आहे. सोमवारी मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा होणार आहे. त्या वेळी विविध विभागांचे मंत्रीही उपस्थित असणार आहेत. मात्र मुख्यमंत्री मागण्या मान्य करीत नाहीत, तोपर्यंत या ठिकाणाहून उठायचे नाही, असा निर्धारही पाटणकर यांनी या वेळी व्यक्त केला.