पालकमंत्र्यांची ‘कोयने’त गोपनीय बैठक
By Admin | Updated: January 19, 2015 00:25 IST2015-01-18T22:29:25+5:302015-01-19T00:25:50+5:30
कोयना प्रकल्पाच्या सर्व अधिकाऱ्यांची गोपनीय बैठक घेऊन प्रकल्पाच्या विविध प्रश्नांचा आढावा घेतला

पालकमंत्र्यांची ‘कोयने’त गोपनीय बैठक
कोयनानगर : पालकमंत्री विजय शिवतारे पाटण दौऱ्यावर आले असून, त्यांनी रविवारी सायंकाळी कोयना प्रकल्पाच्या सर्व अधिकाऱ्यांची गोपनीय बैठक घेऊन प्रकल्पाच्या विविध प्रश्नांचा आढावा घेतला. पालकमंत्री पाटण दौऱ्यावर येणार असल्याने सकाळपासून कोयना प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांची धावपळ सुरू होती. मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र पानसे, कार्यकारी अधिकारी (बांधकाम) उपेंद्र रोकडे, अधीक्षक अभियंता राजेंद्र्र मोहिते, कार्यकारी अधिकारी (धरण व्यपवस्थापन) एम. आय. धरणे यांच्यासह प्रकल्पाचे सर्व अधिकारी कार्यरत होते. पालकमंत्री शिवतारे यांनी आ. शंभूराज देसाई यांच्या निवासस्थानी भेट दिली. लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या स्मृतीस अभिवादन करून साखर कारखान्याची पाहणी केली. सायंकाळी कोयनानगरच्या शासकीय विश्रामगृहावर ते दाखल झाले. यावेळी त्यांनी जलसंपदा विभागाच्या अखत्यारित कोयना प्रकल्पाच्या सर्व अधिकाऱ्यांची गोपनीय बैठक घेतली.आ. शंभूराज देसाई, शिवसेनेचे जिल्हा संपर्क प्रमुख नितीन बानुगडे-पाटील, जिल्हा प्रमुख हर्षद कदम, उपजिल्हा प्रमुख जयवंत शेलार, तालुका प्रमुख रवींद्र पाटील, शिवसेना नेते गजानन कदम यांच्यासह कोयना प्रकल्पाचे अधिकारी उपस्थित होते.
दरम्यान, या दौऱ्यावेळी माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनीही त्यांचा सत्कार केला. (वार्ताहर)