पालकमंत्र्यांनी माझ्या विरोधात गुन्हा दाखल करावा

By Admin | Updated: June 29, 2014 00:28 IST2014-06-29T00:25:29+5:302014-06-29T00:28:16+5:30

शंकर गोडसे : चप्पल उगारल्याप्रकरणी खुलेआम आव्हान

Guardian minister should register an FIR against me | पालकमंत्र्यांनी माझ्या विरोधात गुन्हा दाखल करावा

पालकमंत्र्यांनी माझ्या विरोधात गुन्हा दाखल करावा

सातारा : शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी रस्त्यावर उतरून प्रसंगी वर्ष-वर्ष कारावास भोगताना ज्या वेदना झाल्या नाहीत. त्यापेक्षाही मुंबई बाजार समितीच्या ‘एफएसआय’ विक्रीतून झालेल्या १३८ कोटी १० लाखांच्या भ्रष्टाचार उघडकीस आल्याने पोलीस तपास निप:क्षपातीपणे व्हावा, यासाठी मुंबई बाजार समितीचे संचालक आणि पालकमंत्री शशिकांत शिंदे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा; अन्यथा रस्त्यावरून फिरू दिले जाणार नाही,’ असा इशारा शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शंकर गोडसे यांनी दिला आहे.
ऊस, कापूस यांच्या दराबाबत संघटनेच्या माध्यमातून आवाज उठवल्यानेच आज शेतकऱ्यांना चार अंकी उसाला दर मिळत आहे. उरमोडी, जिहे-कठापूर, धोम-बलकवडी, नीरा-भीमा स्थिरीकरण या प्रकल्पांच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्राल्या शेती पाणी प्रश्नासाठी अनेकदा कारावास भोगला. आजवर २१० खटले माझ्यावर राज्यातील विविध न्यायालयांत प्रलंबित आहेत.’
‘पाटबंधारे विभागाच्या मालकीच्या जागेत अतिक्रमण काढण्यासाठी विनंती करूनही अधिकाऱ्याकडे दुर्लक्ष होत आहे. शासनाच्या जमिनीसाठी मी धोमचे कार्यकारी अभियंता दिनकर मोरे यांच्यावर चप्पल उगारल्यानंतर त्याचे दु:ख मोरे यांना झाले नाही मग ही बाब शिंदे यांच्या जिव्हारी लागल्याने अधिकाऱ्यांच्या बैठकीत माझ्यावर फौजदारी खटला दाखल का केला नाही. अशा धमकी देतच ‘मोरेंनीच काय तुमच्यात दम असेल तर तुम्ही पोलीस ठाण्यात तक्रार करा,’ त्याला भीक घालत नाही. विधानसभा निवडणुकीत त्याचे परिणाम दिसतील, त्यासाठी सज्ज राहा,’ असा इशारा गोडसे यांना दिला आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Guardian minister should register an FIR against me

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.