शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

अगोदर भाषण, नंतर उद्घाटन; मंत्री जयकुमार गोरे यांना उशीर झाल्याने पालकमंत्री शंभूराज देसाई ताटकळले

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2025 18:35 IST

सीईओंच्या कामाचे काैतुक..

सातारा : सातारा जिल्हा परिषदेच्या सभागृहात ग्रामविकास विभागाचा मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान कार्यक्रम कार्यशाळेला पालकमंत्रीशंभूराज देसाई हे वेळेत उपस्थित झाले. पण, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांना वेळ लागला. त्यामुळे पालकमंत्र्यांनी प्रथम भाषण करून गोरे यांच्या अभियानाला शुभेच्छा दिल्या. त्यानंतर मंत्री गोरे आल्यावर दोघांनी मिळून कार्यशाळेचे उद्घाटन केले. यानंतरच पालकमंत्री पुढील कार्यक्रमासाठी निघून गेले.राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाकडून मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान सुरू होत आहे. यासाठी जिल्हास्तरीय कार्यशाळा सातारा जिल्हा परिषदेच्या दिवंगत यशवंतराव चव्हाण बहुउद्देशीय सभागृहात होती. या कार्यशाळेला जिल्ह्यातून शेकडो सरपंच आलेले. पालकमंत्री शंभूराज देसाई, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन आणि इतर अधिकारीही उपस्थित होते.कार्यशाळेच्या ठिकाणी पालकमंत्री अगोदर आले होते. मात्र, ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांना मुंबईवरून येणार असल्याने उशीर झाला. त्यामुळे उद्घाटनाचा कार्यक्रम पुढे गेला. यादरम्यान, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांचे मार्गदर्शन झाले. त्यानंतर पालकमंत्री बोलण्यासाठी उठले. कार्यक्रम ग्रामविकास विभागाचा आहे. ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्या संकल्पनेतून अभियान सुरू आहे. ते आले की आपण दीपप्रज्वलन करून उद्घाटन करू. मला पुढील कार्यक्रम असल्याने आता बोलतो असे त्यांनी स्पष्ट केले. तसेच त्यांनी उपस्थित सरपंच आणि लोकप्रतिनिधींना मार्गदर्शन केले.पालकमंत्री देसाई यांचे मार्गदर्शन सुरू असतानाच ग्रामविकास मंत्री गोरे यांची एंट्री झाली. त्यानंतर पालकमंत्री आणि मंत्री गोरे यांनी एकत्रित दीपप्रज्वलन करून कार्यशाळेचे उद्घाटन केले. तसेच घडीपत्रिकेचे विमोचन केले. पर्यावरणपूरक गणेशोत्सव पार पाडणाऱ्या गावांचाही दोघांच्या हस्ते सन्मान झाला. यानंतर पालकमंत्री देसाई पुढील कार्यक्रमासाठी निघून गेले, तर यानंतर मंत्री गोरे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

सीईओंच्या कामाचे काैतुक..कार्यशाळेत पालकमंत्री देसाई यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्या कामाचे काैतुक केले. तसेच सरपंच आणि ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात घेतल्यास जिल्हा स्वच्छ होईल हे सांगण्यासही ते विसरले नाहीत. तर मंत्री गोरे यांनीही मुख्य कार्यकारी अधिकारी नागराजन आणि त्यांचे पती कोल्हापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी या दोघांनी सातारा आणि कोल्हापूर जिल्हे अभियानात राज्यात पुढे राहतील असा शब्द दिला आहे, असे सांगितले. तसेच नागराजन यांचे कामाबद्दल काैतुकही केले.