क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2021 04:29 IST2021-01-10T04:29:49+5:302021-01-10T04:29:49+5:30
येथील आदर्श ज्युनियर कॉलेज व आनंदराव चव्हाण विद्यालय, मलकापूर येथे कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. स्वाती थोरात यांच्याहस्ते व सारिका गावडे ...

क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांना अभिवादन
येथील आदर्श ज्युनियर कॉलेज व आनंदराव चव्हाण विद्यालय, मलकापूर येथे कार्यक्रमाच्या अध्यक्षा डॉ. स्वाती थोरात यांच्याहस्ते व सारिका गावडे तसेच विद्यालयातील सर्व शिक्षिका यांच्या प्रमुख उपस्थितीत सावित्रीबाईंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. डॉ. थोरात यांनी आपणही सावित्रीबाईंच्या वारसदार आहोत, याची जाणीव ठेवून प्रत्येक विद्यार्थिनींनी आपले जीवन जगावे तरच स्त्रीशिक्षणाचा उद्धार होईल, असा सल्ला दिला.
डॉ. सारिका गावडे, सहायक शिक्षिका एच. एम. मुल्ला, सुरेखा खंडागळे यांच्यासह विद्यार्थिनींनी मनोगत व्यक्त केले. व्ही. एस. येडगे यांनी प्रास्ताविक केले. आदर्श ज्युनियर कॉलेजच्या विभागप्रमुख शीला पाटील यांनी सूत्रसंचालन केले. एस. टी.कांबळे यांनी आभार मानले. प्राचार्य एस. वाय. गाडे, उपमुख्याध्यापक एस. बी. शिर्के, पर्यवेक्षक ए. एन. शिर्के उपस्थित होते.