योजनांच्या लाभासाठी ग्रामपंचायतींनी पुढाकार घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 24, 2021 04:36 IST2021-03-24T04:36:50+5:302021-03-24T04:36:50+5:30
त्रिपुडी, ता. पाटण येथील ग्रामपंचायत कार्यालयात लेक लाडकी अभियान व तालुका प्रशासन यांच्यावतीने ‘मी समृध्द, गाव समृद्ध’ योजनेअंतर्गत वीस ...

योजनांच्या लाभासाठी ग्रामपंचायतींनी पुढाकार घ्यावा
त्रिपुडी, ता. पाटण येथील ग्रामपंचायत कार्यालयात लेक लाडकी अभियान व तालुका प्रशासन यांच्यावतीने ‘मी समृध्द, गाव समृद्ध’ योजनेअंतर्गत वीस महिलांच्या नावे असणाऱ्या सात-बाराचे वाटप करण्यात आले, त्यावेळी त्या बोलत होत्या. तहसीलदार योगेश्वर टोंपे, सामाजिक कार्यकर्त्या आणि लेक लाडकी अभियानाच्या प्रमुख अॅड. वर्षा देशपांडे, अॅड. शैलाताई जाधव, सरपंच नंदा पाटील, उपसरपंच राहुल देसाई यांची प्रमुख उपस्थिती होती.
किरण कुलकर्णी म्हणाल्या, घर दोघांचे आणि लक्ष्मीमुक्तीची अंमलबजावणी निश्चितच शासन करेल. आज प्रथमच पाटण तालुक्यातील त्रिपुडी गावात महिलांच्या नावे सात-बाराचे वाटप करण्यात आले. हा क्षण विलक्षणीय आहे. यासाठी लेक लाडकी अभियानाने सहकार्य करून पुढाकार घेतला, ही बाब अभिमानास्पद आहे. अशा पध्दतीने शासन, प्रशासन आणि एनजीओ यांच्या मदतीने काम केले, तर महिलांना निश्चित लाभ होईल.
अॅड. वर्षा देशपांडे म्हणाल्या, त्रिपुडी गावात पतीबरोबर पत्नीला सात-बाराचे वाटप करण्यात आले. १०५ खातेदारांनी पुढाकार घेत आपल्या पत्नीच्या नावाने जमीन तिला सहमालक म्हणून सात-बारावर नोंद केली आहे. यातील पहिले २० उतारे वाटप करण्यात आले. उपजिल्हाधिकारी किरण कुलकर्णी व तहसीलदार टोंपे यांच्या माध्यमातून हे काम झाले आहे.
यावेळी तहसीलदार योगेश्वर टोंपे यांचेही भाषण झाले. लेक लाडकी अभियानाचे सदस्य जनार्दन पवार, सखाराम पवार, मुख्याध्यापक संजय देसाई, भरत पाटील, ग्रामसेवक एस. एम. कांबळे, विस्तार अधिकारी ए. के. गायकवाड, तलाठी बी. व्ही. गायकवाड, कैलास जाधव, गोविंद देसाई उपस्थित होते.
फोटो : २३केआरडी०५
कॅप्शन :
त्रिपुडी, ता. पाटण येथे महिलांना सात-बाराचे वाटप उपजिल्हाधिकारी किरण कुलकर्णी, अॅड. वर्षा देशपांडे यांच्याहस्ते करण्यात आले.