शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

रखडलेल्या प्रकल्पांना शासनाचा ‘बुस्टर डोस’ , कास धरण उंचीचे काम मार्गी लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 28, 2020 19:49 IST

राज्य शासनाने जिल्'ासाठी ३२५ कोटी रुपयांचा नियोजन आराखडा मंजूर केला आहे. यंदाच्या वर्षासाठी ६१ कोटी ५१ लाख रुपये अतिरिक्त निधी मंजूर केला आहे. तर जिल्'ातील प्रत्येक आमदाराला ५० लाख रुपयांचा अतिरिक्त निधी देण्यात आलेला आहे.

ठळक मुद्देसातारा जिल्हावासीयांना दिलासा : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय

सातारा : जिल्'ातील रखडलेल्या प्रमुख प्रकल्पांना प्रत्यक्षात निधी देण्याची घोषणा राज्य शासनाने केल्याने या प्रकल्पांना आता ‘बुस्टर डोस’ मिळणार आहे. निधी मिळाल्यानंतर ही कामे वेगाने पूर्ण व्हावीत, ही जिल्हावासीयांची भावना आहे.सातारा जिल्'ातील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, कास धरण उंची वाढविण्याचे काम, छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालयाची अद्ययावत इमारत आदी कामांना आघाडी शासनाच्या काळात मंजुरी मिळाली होती; परंतु जवळपास दहा वर्षांपासून ही कामे अत्यंत संथगतीने सुरू राहिली. मधल्या काही काळात तर यापैकी बहुतांश कामे थांबली होती. सातारा शहरातील ग्रेड सेपरेटरचे काम वगळता एकही वैशिष्ट्यपूर्ण काम मागील पाच वर्षांत झाले नाही.

राज्य शासनाने जिल्'ासाठी ३२५ कोटी रुपयांचा नियोजन आराखडा मंजूर केला आहे. यंदाच्या वर्षासाठी ६१ कोटी ५१ लाख रुपये अतिरिक्त निधी मंजूर केला आहे. तर जिल्'ातील प्रत्येक आमदाराला ५० लाख रुपयांचा अतिरिक्त निधी देण्यात आलेला आहे.दरम्यान, याव्यतिरिक्त जिल्'ातील रखडलेल्या प्रकल्पांसाठी वेगळा निधी मंजूर केला आहे. कास धरण उंची, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, क्रीडाक्षेत्राचा विकास, पुसेगाव, औंध, नायकबा, पाल, मांढरदेव आदी तीर्थक्षेत्रांचा विकास तसेच फलटणचे श्रीराम मंदिर आणि म्हसवडचे सिद्धनाथाचे मंदिर यांच्या सुशोभीकरणासाठी ग्रामविकास व नगरविकास खात्यामार्फत प्रत्येकी पाच कोटींचा निधी मंजूर केलेला आहे. राज्याच्या आगामी अर्थसंकल्पात या निधीची तरतूद करण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी दिली आहे.शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी पदनिर्मितीशासकीय वैद्यकीय महाविद्यालय उभारणीसाठी राष्ट्रवादी-काँगे्रस आघाडी शासनाच्या काळात मान्यता मिळालेली होती. सातारा तालुक्यातील खावली गावात असलेल्या शासकीय जागेवर वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यात येणार होते; परंतु ही जागा बदलून सिंचन विभागाची २५ एकर जागा निवडण्यात आली, ही जागा वैद्यकीय शिक्षण विभागाकडे वर्ग करण्यात आली होती. आता ८० कोटींचा निधी जाहीर झाल्याने प्रत्यक्षात विद्यार्थी वसतिगृह व पदनिर्मितीचे काम सुरू होणार आहे.

 

टॅग्स :Satara areaसातारा परिसरMONEYपैसाfundsनिधी