शहरं
Join us  
Trending Stories
1
CAA अंतर्गत भारताचे नागरिकत्व देण्यास सुरुवात, गृहमंत्रालयाने 14 जणांना दिली प्रमाणपत्रे...
2
चार प्रमुख उमेदवार, चार फॅक्टर! कोण होणार औरंगाबादचा खासदार?; मतदानानंतर असं दिसतंय 'गणित'
3
पीओके हा भारताचा भाग, त्यावर आमचा अधिकार - अमित शाह
4
"फिरायला गेले नव्हते..."! प्रियांका गांधी अमित शाह यांच्यावर भडकल्या; थायलंडला कशासाठी गेल्या होत्या? स्पष्टच सांगितलं
5
इस्रायलचं टेन्शन वाढणार! दक्षिण आफ्रिकेची आंतरराष्ट्रीय कोर्टात याचिका; उद्या होणार सुनावणी
6
ज्या सत्तेला सोनिया गांधींनी नाकारले, त्या सत्तेवर मोदींचा डोळा; मल्लिकार्जुन खरगेंचा हल्लाबोल...
7
एका लग्नाची दुसरी गोष्ट! 75 वर्षीय वडिलांसाठी लेकीने निवडली 60 वर्षांची नवरी
8
स्टार क्रिकेटपटूची बलात्काराच्या प्रकरणातून निर्दोष मुक्तता; ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळण्यास सज्ज
9
'कपिल शर्मा शो' च्या जागी येतोय 'झाकीर खान शो'? कॉमेडी अन् शायरीची असणार मेजवानी
10
धक्कादायक! तरुणी झोपली होती, प्रियकरानं घरात घुसून केली हत्या, घटनेनं शहर हादरलं
11
मुसलमान आणि आमचा DNA एकच; मुलाच्या प्रचारावेळी बोलताना ब्रिजभूषण भावूक  
12
12वी पास कंगनाकडे कोट्यवधींचे हीरे, एकाच दिवसात खरेदी केल्या LIC च्या 50 पॉलिसी, जाणून घ्या किती आहे संपत्ती?
13
गंभीर हसल्याशिवाय क्रशला प्रपोज करणार नाही; तरूणीच्या पोस्टरला भारतीय दिग्गजाचं उत्तर
14
मराठमोळ्या अभिनेत्रीला झालाय गंभीर आजार, व्हिडिओ शेअर करत म्हणाली, 'मी प्रेग्नंट नाही...'
15
"आमच्या घरी ईद साजरी केली जायची"; पंतप्रधान मोदींनी सांगितला मुस्लिम शेजाऱ्यांचा किस्सा
16
निवडणूक प्रचारात कांद्यासाठी आंदोलनाची घोषणा; पण लंकेंनी आता शेतकऱ्यांना केलं नवं आवाहन!
17
PM Modi Net Worth: कोणत्या बँकेत आहे PM नरेंद्र मोदींचं खातं, कुठे आहे गुंतवणूक? पाहा डिटेल्स
18
सत्तापिपासून भाजपा मृतदेहांवरून रॅली काढतंय का? मोदींच्या घाटकोपरमधील रोड शो वरून काँग्रेसचा जळजळीत सवाल
19
'लोकांचा जीव जातोय आणि हिला डान्स सुचतोय'; पाऊस पडल्यानंतर रील केल्यामुळे मन्नारा चोप्रा ट्रोल
20
Kangana Ranaut : "तुम्ही मला एकदा मारलंत तर अनेक वेळा..."; कंगना राणौतचं विक्रमादित्य सिंहांवर टीकास्त्र

सीतामाई यात्रेसाठी शासकीय यंत्रणा सज्ज, चाफळला नियोजन बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 3:02 PM

तीर्थक्षेत्र चाफळ (ता. पाटण) येथील येथील श्रीराम मंदिरात मंगळवार, दि. १५ रोजी सीतामाई यात्रा होत आहे. या यात्रेसाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी शासकीय बैठक पार पडली.

ठळक मुद्देसीतामाई यात्रेसाठी शासकीय यंत्रणा सज्ज, चाफळला नियोजन बैठक विविध विभागांना सूचना; पोलीस अधिकाऱ्यांसह मान्यवरांची उपस्थिती

चाफळ : तीर्थक्षेत्र चाफळ (ता. पाटण) येथील येथील श्रीराम मंदिरात मंगळवार, दि. १५ रोजी सीतामाई यात्रा होत आहे. या यात्रेसाठी शासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. या पार्श्वभूमीवर रविवारी शासकीय बैठक पार पडली.पाटणचे मंडलाधिकारी हणमंतराव शेजवळ यांच्या अध्यक्षतेखाली येथील श्रीराम मंदिरातील समर्थ सभागृहात ही बैठक पार पडली. यावेळी सहायक पोलीस निरीक्षक शिवराम खाडे, चाफळ पोलीस दूरक्षेत्राचे गणेश भोसले, सरपंच अलका पाटील, उपसरपंच उमेश पवार, गावकामगार तलाठी एस. एम. दूधगावकर, एस. आर. देशमुख, विश्वस्त अनिल साळुंखे, चंद्रकांत पाटील, व्यवस्थापक बा. मा. सुतार, सागर चव्हाण आदींची प्रमुख उपस्थिती होती.यात्रेस मकरसंक्रांतीनिमित्त महिलांची वाढती संख्या लक्षात घेता या प्रशासनाकडून शांतता, कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने उपाययोजना करण्यात आली असून, यासाठी सर्वांनी सहकार्याची भूमिका बजावावी, असे आवाहन पाटणचे मंडल अधिकारी हणमंतराव शेजवळ यांनी केले.दक्षिण महाराष्ट्राची काशी समजल्या जाणाऱ्या या तीर्थक्षेत्रास पर्यटनस्थळाचा ब वर्ग दर्जा मिळालेला आहे. चाफळच्या या सीतामाई यात्रेला तीन दशकांची परंपरा आहे. सध्या येथे येणाऱ्या महिला भाविकांना सीतामाईच्या दर्शनासाठी मंदिर परिसरात बॅरिकेट उभारण्यात येत आहेत. तर पिण्याच्या पाण्यासह शेजारील शेतामध्ये वाहन पार्किंगची सुलभव्यवस्था करण्यात आली आहे.

टॅग्स :Religious Placesधार्मिक स्थळेSatara areaसातारा परिसर