शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कऱ्हाडातील गुंड दोन वर्षांसाठी हद्दपार, सातारासह सांगलीच्या तीन तालुक्यात प्रवेशबंदी

By संजय पाटील | Updated: January 11, 2024 19:10 IST

कऱ्हाड : शहरासह तालुका परिसरात सातत्याने शरिराविरुध्दचे गुन्हे करणाऱ्या दोघांना दोन वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. तसेच त्या ...

कऱ्हाड : शहरासह तालुका परिसरात सातत्याने शरिराविरुध्दचे गुन्हे करणाऱ्या दोघांना दोन वर्षासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे. तसेच त्या दोघांना सांगली जिल्ह्यातील शिराळा, वाळवा, कडेगाव तालुक्यातही प्रवेशास मनाई करण्यात आली आहे.आबीद आलम मुजावर (वय २६) व साहील आलम मुजावर (२१, दोघे रा. पालकरवाडा, मंगळवार पेठ, कऱ्हाड) अशी त्यांची नावे आहेत. पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी जिल्ह्यात टोळीने जमाव जमवुन दुखापत करणे, शिवीगाळ दमदाटी करुन मारहाण करणाऱ्यांसह अनेकांना लक्ष्य केले आहे. त्याचदृष्टीने शहरातील दोघांना हद्दपार केले आहे. पोलिस निरिक्षक प्रदीप सुर्यवंशी यांनी दोघांच्या हद्दपारीचा प्रस्ताव पाठवला होता. त्या प्रस्तावाला पोलिस उपाधीक्षक अमोल ठाकूर यांनाही मान्यता दिली होती. त्यानुसार त्या दोघांना सातारा जिल्हा, सांगली जिल्ह्यातील शिराळा, वाळवा, कडेगांव तालुक्यातुन दोन वर्षे हद्दपार करण्याचा प्रस्तावात उल्लेख केला होता. संबंधित दोघेही जामीनावर बाहेर आल्यानंतर त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई केली गेली. तरीही त्यांच्यावर परिणाम होत नव्हता. तसेच त्यांच्या गुन्हेगारी कृत्यांमध्ये सुधारणा होत नव्हती. त्यामुळे पोलिस अधीक्षक समीर शेख यांनी हद्दपार प्राधिकरणासमोर सुनावणी घेतली. त्यानुसार त्या दोघांना पोलिस उपाधीक्षक शेख यांनी महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५५ अन्वये सातारा जिल्हा व सांगली जिल्हयातील शिराळा, वाळवा, कडेगांव तालुका हद्दीतुन दोन वर्षासाठी हद्दपारीचा आदेश केला आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस