बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार, परिसरात भितीचे वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 11, 2021 19:09 IST2021-01-11T19:07:13+5:302021-01-11T19:09:18+5:30
leopard Satara ForestDepartment- विभागातील दाढोली गावच्या परिसरात बिबट्याने शेळीला ठार केले. या घटनेने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.

बिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठार, परिसरात भितीचे वातावरण
ठळक मुद्देबिबट्याच्या हल्ल्यात शेळी ठारपरिसरात भितीचे वातावरण
चाफळ : विभागातील दाढोली गावच्या परिसरात बिबट्याने शेळीला ठार केले. या घटनेने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे.
दाढोली गावच्या परिसरात शुक्रवारी दुपारी शांताराम सखाराम डांगे आपल्या शेताजवळ शेळीला चारा देत असताना अचानक बिबट्याने हल्ला केला. या हल्ल्यात शेळी ठार झाली. शांताराम डांगे यांनी आरडाओरडा करताच बिबट्याने तेथून धुम ठोकली.
घटनास्थळी वनाधिकारी व कर्मचाऱ्यांनी भेट देऊन पंचनामा केला आहे. या घटनेने परिसरात भितीचे वातावरण पसरले आहे. वनविभागाने तातडीने मदत देण्याची मागणी डांगे यांनी केली आहे.