शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

गोवा बनावटीचा २० लाखांचा मद्यसाठा कराडात पकडला, दोघे ताब्यात

By प्रमोद सुकरे | Updated: July 22, 2023 15:25 IST

कराड : सातारा जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अमली पदार्थ तसेच बनावटीचा मद्यसाठा विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई केली जात ...

कराड : सातारा जिल्ह्यात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अमली पदार्थ तसेच बनावटीचा मद्यसाठा विक्री करणाऱ्यांवर धडक कारवाई केली जात आहे. दरम्यान कराड येथील उत्पादन शुल्क विभागाने कराड हद्दीत गोवा बनावटीचा तब्बल २० लाखांचा मद्यसाठा पकडला आहे. यामध्ये दोघांना अटक करण्यात आली आहे. राज्य उत्पादन शुल्क, कोल्हापूर विभागाचे विभागीय उप-आयुक्त विजय चिंचाळकर व अधीक्षक  किर्ती शेडगे यांच्या नेतृत्वाखाली कराड या कार्यक्षेत्रात शुक्रवार दि. २१ रोजी नांदलापूर (ता. कराड)  गावच्या हद्दीतून जाणाऱ्या पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गवरून अवैद्य मद्याची वाहतुक करत असताना एक संशयीत महिंद्रा कंपनीची चारचाकी गाडी क्रमांक ९MH-१७-BY-९४३७) निदर्शनास आली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी वाहनाची झडती घेतली असता त्यामध्ये गोवा बनावटीच्या मद्याचे एकूण ११० बॉक्स म्हणजेच ७५० मिली क्षमतेच्या १ हजार ३२० सिलबंद बाटल्या मिळून आल्या. हे चारचाकी वाहन तसेच दोन मोबाईल संच असा एकूण १७ लाख ३७ हजार किंमतीचा दारुबंदी गुन्ह्यातील मुद्देमाल जप्त करण्यात आला. गुन्हामध्ये अजय वसंत कुळधरण (वय २८) व साहिल रामदास धात्रक (वय २०, दोघे रा. पिंपरी लोकें ता. राहाटा जि. अहमदनगर) यांना अटक करण्यात आली आहे.दोघांवर महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५ (ई) (अ),८०,८३,९०,९८,१०८ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  कारवाईमध्ये दुय्यम निरीक्षक व्ही. बी. शिंदे, दुय्यम निरीक्षक पी.व्ही.नागरगोजे, सहाय्यक निरीक्षक पी. आर. गायकवाड, व्ही .व्ही. बनसोडे, यांनी सहभाग घेतला. सदर गुन्ह्यातील तपास राज्य उत्पादन शुल्क कराड विभागाचे दुय्यम निरीक्षक व्ही. बी. शिंदे हे करत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस