ग्रामीण विद्यार्थ्यांची गौरवास्पद कामगिरी
By Admin | Updated: July 25, 2014 22:17 IST2014-07-25T21:01:02+5:302014-07-25T22:17:14+5:30
राज्यातील गुणवत्ता यादीतील विद्यार्थी

ग्रामीण विद्यार्थ्यांची गौरवास्पद कामगिरी
ग्रामीण विद्यार्थ्यांची गौरवास्पद कामगिरी
अनंत अडचणींवर मात करून पायपीट करत शाळेत जाणाऱ्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे भरघोस यश हे या शिष्यवृत्तीचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. वाघेश्वरच्या जिल्हा परिषद शाळेत शिकणाऱ्या हर्षल गजानन चेणगे याने चौथा तर नगर पालिकेच्या शाळेत शिकणारी वैष्णवी थोरात हिने राज्यात सातवा क्रमांक मिळविला. या विद्यार्थ्यांना शिक्षिका वृषाली शेटे यांनी मार्गदर्शन केले.
राज्यातील गुणवत्ता यादीतील विद्यार्थी
जिल्ह्यातील विविध शाळांमधील २५ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत स्थान पटकावले आहे. पूर्व माध्यमिक, (शहरी) - वैष्णवी थोरात, विश्वजित येवले. (ग्रामीण) - हर्षल चेणगे, चिन्मयी भिसे, प्रणव बाजारे, रितेश मोरे, विश्वांजली जमदाडे. माध्यमिक (शहरी) - वृषाली तिखे, प्रथमेश यादव, समरसिंह साळुंखे, साक्षी जोशी, मुग्धा जगदाप, विश्वजित कदम, अंकिता मोरे, श्रावणी जाधव.
(ग्रामीण) - ऋषिकेश मोहिते, तेजस शिंदे, निरंजन खैरमोडे, स्नेहल तळेकर, सुहेब नदाफ, सोहेल मोदी, संकेत पवार, आदित्य लोहार, योगिता चौधरी.