मुलींना कायदे माहिती असावेत - काळुगडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 1, 2021 04:39 IST2021-04-01T04:39:37+5:302021-04-01T04:39:37+5:30
रामापूर : ‘कोमल है कमजोर नही, शक्ती का नाम ही नारी है...’ याप्रमाणे आजची स्त्री ही खरोखरच स्वतःच्या पायावर ...

मुलींना कायदे माहिती असावेत - काळुगडे
रामापूर : ‘कोमल है कमजोर नही, शक्ती का नाम ही नारी है...’ याप्रमाणे आजची स्त्री ही खरोखरच स्वतःच्या पायावर उभी आहे. मात्र, असे असले तरी, अजूनही काही ठिकाणी स्त्रिया सुरक्षित नाहीत. त्यांच्यावर समाजातील विकृत लोकांकडून हल्ले होत आहेत. त्यामुळे याबाबत मुलींना कायदे माहीत असले पाहिजेत, असे मत ॲड. रंगराव काळुगडे यांनी व्यक्त केले.
पाटण येथील सौ. सुलोचनाबाई पाटणकर कन्या शाला पाटण आणि एकात्मिक बालविकास प्रकल्प यांच्या संयुक्त विद्यमाने ‘किशोरवयीन मुलींना कायद्याची माहिती’ या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सौ. सुलोचनाबाई पाटणकर कन्या शाला पाटणच्या मुख्याध्यापिका शीलादेवी पाटणकर, एकात्मिक बालविकास प्रकल्प दोनच्या पर्यवेक्षिका सुषमा पाटील, अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि विद्यार्थिनी उपस्थित होत्या.
काळुगडे म्हणाले, मानव हा समाजशील प्राणी आहे. समाजाच्या सुरक्षिततेसाठी कायदे आहेत. महिलांच्या सुरक्षिततेसाठी अनेक कायदे आहेत. जर आपणास काही त्रास होत असेल, तर किशोरवयीन मुलींनी पोलीस अधिकारी, न्यायालयीन कायदे यांची मदत घेतली पाहिजे. स्वत:च्या बचावासाठी तरतूद कायद्यात आहे. स्त्रियांविरोधात सर्व गुन्हे हे दखलपात्र आहेत, याची माहिती महिलांना असली पाहिजे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शीलादेवी पाटणकर यांनी केले, तर हेमा रणदिवे यांनी आभार मानले.
फोटो -
पाटण येथील सौ. सुलोचनाबाई पाटणकर कन्या शाला पाटण येथे मार्गदर्शन करताना रंगराव काळुगडे, व्यासपीठावर मुख्याध्यापिका शीलादेवी पाटणकर, एकात्मिक बाल विकासच्या पर्यवेक्षिका सुषमा पाटील आदी.