शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 30, 2025 23:34 IST

ती तरुणी कोण? मोबाइल उलगडणार रहस्य...

सातारा : प्रेयसी दुसऱ्या मुलासोबत लॉजमधून बाहेर पडताना दिसताच प्रियकराने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना साताऱ्यातील उपनगरात शनिवारी सायंकाळी घडली.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सातारा शहराजवळील संभाजीनगर परिसरात एक १८ वर्षीय तरुण आपल्या कुटुंबासह वास्तव्यास होता. बारावी उत्तीर्ण झाल्यानंतर त्याने पहिल्या वर्षाला अँडमिशनही घेतले होते. त्याच काॅलेजमधील बारावीत शिक्षण घेणाऱ्या एका तरुणीसोबत त्याचे प्रेमसंबंध होते. गेल्या काही वर्षांपासून दोघे एकत्र फिरायचे, भेटायचे. त्यातच शनिवारी दुपारी त्याची प्रेयसी दुसऱ्या एका मुलासोबत लाॅजमध्ये गेली होती. ती मुलासोबत लाॅजमधून परत येताना संबंधित प्रियकर तरुणाने तिला पाहिले. यामुळे तो अस्वस्थ झाला. यानंतर त्याने त्याच्या मोठ्या भावाला फोन केला. माझे कोमल (बदललेले नाव) सोबत प्रेमसंबंध आहेत; पण ती आज मला दुसऱ्या मुलासोबत लाॅजमधून बाहेर पडताना दिसली आहे. तिने मला धोका दिला आहे. मी आता जगणार नाही, असे म्हणून त्याने फोन कट केला. 

या प्रकारानंतर मोठ्या भावाने आपल्या लहान भावाचा शोध घेण्यास सुरुवात केली. भावाच्या फोनवर त्याने फोन करण्याचा प्रयत्न केला असता त्याने फोन बंद केला होता. त्यामुळे अन्य एका मित्राला सोबत घेऊन मोठ्या भावाने घराच्या आजूबाजूला लहान भावाचा शोध घेतला. परंतु तेथेही तो सापडला नाही. त्यानंतर रात्री साडेआठच्या सुमारास जनाई मळाई डोंगराच्या पायथ्याजवळ त्याचा भाऊ शोध घेत तेथे गेला. त्यावेळी ओढ्यातील जांभळीच्या झाडाला नायलाॅनच्या दोरीने लहान भावाने गळफास घेतल्याचे मोठ्या भावाच्या निदर्शनास आले. यानंतर याची माहिती सातारा शहर पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविला. सातारा शहर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.ती तरुणी कोण? मोबाइल उलगडणार रहस्य... -संबंधित मृत तरुणाचा मोबाइल पोलिसांनी हस्तगत केला आहे. त्याच्या मोबाइलमधून संबंधित तरुणीची ओळख पटणार आहे. ती तरुणी कोण आहे. याची माहिती पोलिस घेत आहेत. 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMobileमोबाइलPoliceपोलिसLove Storyदिल-ए-नादान... प्रेमाची गोष्ट