साताऱ्यात इमारतीवरून उडी मारून मुलीची आत्महत्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 19, 2020 11:42 IST2020-05-19T11:41:00+5:302020-05-19T11:42:41+5:30
सातारा येथील समर्थ मंदिर परिसरातील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून ११ वर्षाच्या मुलीने आत्महत्या केली. ही घटना सोमवारी दुपारी घडली.

साताऱ्यात इमारतीवरून उडी मारून मुलीची आत्महत्या
सातारा : येथील समर्थ मंदिर परिसरातील एका इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून ११ वर्षाच्या मुलीने आत्महत्या केली. ही घटना सोमवारी दुपारी घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, संबंधित मुलीचे वडील आणि आई एकत्र राहात नाहीत. न्यायालयात घटस्फोटासाठी त्यांची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे ही मुलगी आजीकडे समर्थ मंदिर परिसरातील एका इमारतीमध्ये राहात होती.
गेल्या काही दिवसांपासून ती सतत नैराश्यामध्ये असायची. यातूनच तिने सोमवारी दुपारी इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. हा प्रकार तिच्या आजीला समजल्यानंतर आजीने हंबरडा फोडला.
शाहूपुरी पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन मुलीचा मृतदेह शवविच्छेदनासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविला. या मुलीने नेमक्या कोणत्या कारणातून आत्महत्या केली, याबाबत तिच्या आई-वडिलांकडे पोलीस चौकशी करत आहेत.