शहरं
Join us  
Trending Stories
1
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
2
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
3
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
4
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
5
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
6
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
7
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
8
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
9
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
10
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
11
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
12
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
13
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
14
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
15
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
16
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
17
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
18
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
19
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
20
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'

कोयना धरणाचे दरवाजे दीड फुटावर, विसर्ग कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 2, 2021 14:00 IST

Koyana Dam Satara : सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरूच असून महाबळेश्वर येथे सर्वाधिक ४३ मिलीमीटरची नोंद झाली. तर पाण्याची आवक कमी होत असल्याने कोयनेचे दरवाजे साडे दहा फुटांवरुन दीड फुटापर्यंत खाली घेण्यात आले. त्यामुळे विसर्ग कमी झाला आहे.

ठळक मुद्दे कोयना धरणाचे दरवाजे दीड फुटावर, विसर्ग कमीपश्चिम भागात पाऊस सुरूच; महाबळेश्वरला ४३ मिलीमीटरची नोंद

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पाऊस सुरूच असून महाबळेश्वर येथे सर्वाधिक ४३ मिलीमीटरची नोंद झाली. तर पाण्याची आवक कमी होत असल्याने कोयनेचे दरवाजे साडे दहा फुटांवरुन दीड फुटापर्यंत खाली घेण्यात आले. त्यामुळे विसर्ग कमी झाला आहे.जिल्ह्यात १२ दिवसांपूर्वी धुवाँधार पाऊस पडला होता. कास, बामणोली, तापोळा, नवजा, कोयना आणि महाबळेश्वर भागात धो-धो पावसामुळे ओढे, नाले भरुन वाहत होते. नद्यांना पूर आला होता. तसेच पश्चिम भागातील प्रमुख धरणांत मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली.यामुळे सर्वच धरणांतून विसर्ग सुरू करावा लागला. मात्र, गेल्या आठवड्यापासून पावसाचा जोर कमी झाला आहे. कोयनेसह नवजा, महाबळेश्वर येथेही जेमतेमच पाऊस होत आहे. यामुळे धरणांत येणाऱ्या पाण्याची आवक मंदावली आहे.सोमवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनेला २० मिलीमीटर पाऊस झाला. तर जूनपासून आतापर्यंत ३१४७ मिलीमीटर पर्जन्यमानाची नोंद झाली आहे. नवजा येथे ११ आणि यावर्षी आतापर्यंत ३९९० मिलीमीटर पाऊस झाला. तर महाबळेश्वरला ४३ मिलीमीटर पाऊस पडला. जूनपासून महाबळेश्वरला ४१२७ मिलीमीटर पर्जन्यमान झाले आहे.दरम्यान, सोमवारी सकाळच्या सुमारास कोयना धरणात २४६६४ क्यूसेक वेगाने पाणी येत होते. तर ९ च्या सुमारास धरणाचे सहा दरवाजे साडे दहा फुटांवरुन कमी करण्यात आले. त्यामुळे दीड फुट उचलून त्यातून ७७९५ क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू होता. तर पायथा वीजगृह २१०० असा मिळून ९८९५ क्यूसेक पाण्याचा विसर्ग कोयना धरणातून सुरू होता. तर धरणात ८४.७७ टीएमसी पाणीसाठा झालेला. गेल्या काही दिवसांत धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग करण्यात आल्याने पाणीसाठा कमी झाला आहे.सोमवारी सकाळचा पाणीसाठा सोमवारी सकाळी धोम धरणांत ७६.९९ टक्के पाणीसाठा झाला होता. तर ५३४ क्यूसेकने पाणी विसर्ग करण्यात येत होता. कण्हेरमधून ५७४ क्यूसेक विसर्ग तर धरणांत ७.७४ टीएमसी साठा झालेला. उरमोडी धरण क्षेत्रात सकाळपर्यंत ९ मिलीमीटर पाऊस पडला. तर ७.४९ टीएमसी साठा झाला होता. उरमोडीतून ४५० क्यूसेक पाण्याचा विसर्ग करण्यात येत होता.

टॅग्स :Koyana Damकोयना धरणSatara areaसातारा परिसर