शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

Satara: वकिलाच्या पेहराव्यात न्यायालयात आला, अन् गुंड बंटी जाधववर गोळीबार केला; पोलिसांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 8, 2023 12:12 IST

घटनेमुळे न्यायालयात प्रचंड घबराट पसरली.

वाई : मेणवली, ता. वाई येथील हॉटेल मालकास खंडणी मागितल्याप्रकरणी अनिकेत उर्फ बंटी नारायण जाधव (रा. भुईंज), निखील मोरे, अभिजित शिवाजी मोरे (रा. गंगापुरी, वाई) यांच्यावर वाई न्यायालयातच गोळीबार करण्यात आला. सुदैवाने दोन गोळ्या झाडूनही कोणाला दुखापत झाली नाही. पोलिसांनीगोळीबार करणाऱ्या राजेश नवघने याला जागेवरच ताब्यात घेतले. ही खळबळजनक घटना सोमवारी दुपारी चारच्या सुमारास न्यायालयाच्या व्हरांड्यात घडली.याबाबत अधिक माहिती अशी की, ‘मोक्का’च्या गुन्ह्यात कळंबा कारागृहात असलेला गुंड अनिकेत उर्फ बंटी जाधव (रा. भुईंज, ता. वाई) याने कारागृहातून हाॅटेल व्यावसायिक राजेश नवघने (रा. मेणवली, ता. वाई) याला दहा लाखांची खंडणी मागितली होती. या गुन्ह्यात पोलिसांनी बंटी जाधवसह त्याच्या दोन साथीदारांना अटक केली होती. सोमवारी त्यांची पोलिस कोठडी संपल्याने त्यांना पुन्हा वाई न्यायालयात आणण्यात आले होते. त्यावेळी राजेश नवघने हा काळी पँट आणि पांढरा शर्ट परिधान करून हातात फाइल घेऊन वकिलाच्या पेहराव्यात न्यायालयात आला. फाइलमध्ये त्याने पिस्टल लपवून आणले होते. मात्र, न्यायालयामध्ये दिवाणी खटला सुरू असल्याने बंटी जाधव व त्याच्या सहकाऱ्यांना न्यायालयाच्या बाहेर व्हरांड्यात बाकड्यावर बसवण्यात आले होते. आजूबाजूने पोलिस उभे असल्याने त्याला गोळी झाडता येत नव्हती. त्यामुळे तो समोर असलेल्या बाकड्यावर चढला. इतक्यात पोलिसांची नजर त्याच्याकडे गेली.क्षणाचाही विलंब न करता पोलिसांनी त्याचा हात पकडला. अशा अवस्थेतही राजेशने दोन गोळ्या झाडल्या. परंतु पोलिसांनी त्याचा हात खाली केल्यामुळे या दोन्ही गोळ्या बाकड्याजवळील भिंतीवर लागल्या. त्याच्या हातातून तातडीने पिस्तूल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले. सुदैवाने त्याने झाडलेल्या दोन गोळ्या कोणालाही लागल्या नाहीत. या घटनेमुळे न्यायालयात प्रचंड घबराट पसरली.

घटनास्थळी फिंगरप्रिंट तज्ज्ञ..या घटनेनंतर घटनास्थळी फिंगरप्रिंट एक्स्पर्ट बोलवण्यात आले. तर बंटी जाधव व त्याच्या सहकाऱ्याची खबरदारी म्हणून घटनास्थळी डॉक्टर बोलावून वैद्यकीय तपासणी करण्यात आली. न्यायालयातच हा प्रकार घडल्याने जिल्हा मुख्य न्यायाधीश एस. एस. आडकर यांनी भेट देऊन माहिती घेतली. वाई न्यायालयात बंदोबस्त वाढविण्याची आवश्यकता असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. घटनास्थळी पोलिस अधीक्षक समीर शेख यांनीही भेट दिली.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसFiringगोळीबार