शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Satara: पिस्तुलांसह दरोड्याच्या तयारीतील टोळी गजाआड, पाच जणांना अटक; कऱ्हाडात कारवाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2024 15:23 IST

तीन गावठी पिस्तूल, काडतूस, सुरा, कोयते हस्तगत

कऱ्हाड : दरोड्याच्या तयारीत असलेल्या पाच जणांच्या टोळीला पोलिसांनी थरारक पाठलाग करून पकडले. त्यांच्याकडून तीन गावठी पिस्तुले, जिवंत काडतुसांसह घातक शस्त्रे जप्त केली आहेत. ही कारवाई विद्यानगर-कऱ्हाड येथील जयराम कॉलनीत सोमवारी दुपारी अडीचच्या सुमारास शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शाखेने केली.बबलू उर्फ विजय संजय जावीर (वय ३२, रा. शहापूर, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर), निकेत वसंत पाटणकर (रा. गोडोली, सातारा), सूरज नानासाहेब बुधावले (रा. विसापूर-पुसेगाव, जि. सातारा), राहुल अरुण मेमन (रा. केरळ, सध्या रा. विद्यानगर, कऱ्हाड) व आकाश आनंदा मंडले (रा. खटाव, जि. सातारा) अशी पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केलेल्यांची नावे आहेत.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिस अधीक्षक समीर शेख व अपर अधीक्षक ऑंचल दलाल यांच्या आदेशानुसार कऱ्हाड शहर पोलिस ठाण्याच्या गुन्हे शाखेचे पथक वरिष्ठ पोलिस निरीक्षक के.एन. पाटील, निरीक्षक महेंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी दुपारी शहरासह परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी विद्यानगर येथील जयराम कॉलनीत सशस्त्र दरोडा पडणार असल्याची माहिती या पथकाला मिळाली.त्यानुसार, उपनिरीक्षक पतंग पाटील पथकासह तातडीने त्या ठिकाणी दाखल झाले. त्यांनी पाठलाग करून दरोड्याच्या तयारीत असलेल्या टोळीला पकडले. या टोळीकडून तीन देशी बनावटीची पिस्तुले, चार जिवंत काडतूस, एक धारदार सुरा, दोन कोयते, दोन दुचाकी यासह दरोड्यासाठी आवश्यक असणारे साहित्य पोलिसांनी हस्तगत केले.पोलिसांनी अटक केलेली दरोडेखोरांची टोळी सशस्त्र दरोडा टाकण्याच्या तयारीत होती. मात्र, त्यापूर्वीच पोलिसांनी या टोळीच्या मुसक्या आवळल्या. याबाबतची नोंद कऱ्हाड शहर पोलिस ठाण्यात झाली आहे.

टोळीवर गंभीर गुन्हे दाखलपोलिसांनी अटक केलेल्या टोळीवर विविध पोलिस ठाण्यांमध्ये गंभीर गुन्हे दाखल आहेत. ही टोळी पोलिसांच्या रेकॉर्डवरील टोळी असून यापूर्वी त्यांच्यावर खून, दरोडा, जबरी चोरी, मारहाण, आर्म ॲक्ट यासह इतर गंभीर गुन्हे दाखल आहेत. सोमवारीही ते दरोडा टाकण्याच्या तयारीत असताना पोलिसांनी त्यांना ताब्यात घेऊन अटक केले.

आरोपींवर यापूर्वी दाखल गुन्हेबबलू उर्फ विजय जावीर : खून, दरोडा, जबरी चोरी, सरकारी नोकरावर हल्ला असे सहा गुन्हेनिकेत पाटणकर : खून, दरोडा, जबरी चोरी, मारहाण असे ९ गुन्हेसूरज बुधावले : खून, आर्म ॲक्ट यासारखे २ गंभीर गुन्हेराहून मेनन : खून, घरफोडी, दरोडा, जबरी चोरी असे ४ गुन्हे

टॅग्स :Satara areaसातारा परिसरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस