खड्डे मुजवून शिवसैनिकांची गांधीगिरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:43 IST2021-09-22T04:43:19+5:302021-09-22T04:43:19+5:30
उंब्रज : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या उपमार्गावर व चिपळूण-पंढरपूर राज्यमार्गावर शिवडे फाटा येथे पडलेले खड्डे शिवसैनिकांनी गांधीगिरी करत मुजवले. तसेच ...

खड्डे मुजवून शिवसैनिकांची गांधीगिरी
उंब्रज : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गाच्या उपमार्गावर व चिपळूण-पंढरपूर राज्यमार्गावर शिवडे फाटा येथे पडलेले खड्डे शिवसैनिकांनी गांधीगिरी करत मुजवले. तसेच या उपमार्गावरील व रस्त्यावरील सर्व खड्डे संबंधित विभागाने तातडीने मुजवावेत अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेनेचे कऱ्हाड उत्तरचे उपतालुकाप्रमुख संजय भोसले यांनी दिला.
शिवडे फाटा येथे महामार्गाच्या उपमार्गावर व उंब्रज-मसूर रस्त्यावर मोठया प्रमाणात खड्डे पडले आहेत. संबंधित विभाग हे खड्डे भरण्यासाठी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. त्याचा त्रास वाहनधारकांना होत आहे. त्यामुळे संबंधित विभागाचे या समस्येकडे लक्ष जावे म्हणून शिवसेनेचे कऱ्हाड उत्तरचे उपतालुकाप्रमुख संजय भोसले, शिवडे गावचे शाखाप्रमुख महादेव भोंगाळे, दादासाहेब घाडगे, लक्ष्मण गोंजारे, चंद्रकांत जांभळे, सागर कुलकर्णी व शिवसैनिकांनी शिवडे फाट्यावरील काही खड्डे व सेवा रस्त्यावरील काही खड्डे गांधीगिरी करून मुजवले. या रस्त्यावरील सर्व खड्डे बांधकाम विभाग व राष्ट्रीय महामार्ग देखभाल दुरुस्ती विभागाने त्वरित मुजवावेत. तसेच महामार्गाचे सहापदरीचे काम करताना जागा संपादित करताना स्थानिक लोकांना व शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन काम करावे. अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन केले जाईल, असा इशारा दिला.
२०उंब्रज-शिवसेना
चिपळूण-पंढरपूर राज्य मार्गावरील शिवडे फाटा येथे पडलेले खड्डे शिवसैनिकांनी गांधीगिरी करत मंगळवारी मुजविले. (छाया : अजय जाधव)