फर्निचर शोरूमला लागलेल्या भीषण आगीत फर्निचर जळून खाक; कोट्यवधीचं नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 17:20 IST2021-04-29T17:20:02+5:302021-04-29T17:20:48+5:30

मालासह शेडचे साडे चारकोटीचे नुकसान

Furniture burned to ashes in a fierce fire at a furniture showroom; | फर्निचर शोरूमला लागलेल्या भीषण आगीत फर्निचर जळून खाक; कोट्यवधीचं नुकसान

फर्निचर शोरूमला लागलेल्या भीषण आगीत फर्निचर जळून खाक; कोट्यवधीचं नुकसान

मलकापुर - मलकापुर शहरातील एका महामार्गालगतच्या लोटस फर्निचर शोरूमला आग. आज (गुरुवार) दुपारी ही घटना घडली. पुणे बंगळूर आशियाई महामार्ग लगत असलेल्या लाेटस शोरूममधून धुराचे लोट बाहेर पडू लागले. बघताबघता आगीने रौद्ररूप धारण केले. या अचानक लागलेल्या आगीत फर्निचर जळून खाक झाले. या घटनेत मालासह शेडचे साडेचारकोटीचे नुकसान झाले आहे. 

काही वेळातच धूराचे लाेट माेठ्या प्रमाणात दिसू लागल्यानंतर नागरिकांना त्या ठिकाणी धाव घेतली. तेथूनच काहींनी आग विझवण्यासाठी अग्निशामक दलाला फाेन केले. आगीने राैद्र रुप धारण केल्याने धूराचे लाेट माेठ्या प्रमाणात पसरले. यामुळे महामार्गासह परिसरातील नागरिकांची मोठ्या प्रमाणावर गर्दी झाली. पाेलिस देखील घटनास्थळी पाेचले. आकाशात उंचीपर्यंत धुराचे लोट पसरले होते. आग पहाण्यासाठी नागरीकांची गर्दी वाढली. अखेर गर्दीला हटवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज करावा लागला. लोटस फर्निचरच्या शाेरुमधील सारे साहित्य आगीत बेचिराख झाले आहे. 

 

Web Title: Furniture burned to ashes in a fierce fire at a furniture showroom;

टॅग्स :fireआग