फलटणच्या कत्तलखान्यामधून अतिरेक्यांना वित्त पुरवठा, मिलिंद एकबोटे यांचा खळबळजनक आरोप
By दीपक देशमुख | Updated: August 23, 2023 18:15 IST2023-08-23T18:15:06+5:302023-08-23T18:15:59+5:30
सातारा : फलटण येथील कत्तलखान्याला राज्य राजकीय वरदहस्त आहे. या कारखान्यातून अतिरेक्यांना वित्त पुरवठा केला जातो. त्यामुळे महाराष्ट्राचे पशुधन ...

फलटणच्या कत्तलखान्यामधून अतिरेक्यांना वित्त पुरवठा, मिलिंद एकबोटे यांचा खळबळजनक आरोप
सातारा : फलटण येथील कत्तलखान्याला राज्य राजकीय वरदहस्त आहे. या कारखान्यातून अतिरेक्यांना वित्त पुरवठा केला जातो. त्यामुळे महाराष्ट्राचे पशुधन संपवणाऱ्या हा कत्तलखाना तात्काळ बंद करावा, अशी मागणी अखिल भारतीय कृषी गोसेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष मिलिंद एकबोटे यांनी केली. सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. संघटनेचे मंगेश नरे, निवृत्त पशुसंवर्धन आयुक्त सुधीर भोसले उपस्थित होते.
एकबोटे म्हणाले, फलटण येथे दोन दिवसांपूर्वी गोरक्षक सौरभ सोनवणे आणि अक्षय तावरे यांच्या सहकार्याने दहा म्हशींची गाडी ताब्यात घेऊन गोशाळेत पाठवण्यात आली. यापैकी चार म्हशी दूध देणाऱ्या होत्या. त्यांची कत्तल गोरक्षकांच्या सतर्कतेमुळे तात्पुरती टळली. मात्र, भारतीय प्राणी संवर्धन कायदा लागू होऊन सुद्धा राज्यात प्रभावी अंमलबजावणी होत नाही. फलटण येथील कत्तलखान्यामधून देशी खिलारी गाई आणि म्हशी यांची कत्तल सुरू आहे. हा कत्तलखाना तत्काळ बंद करण्याची मागणी त्यांनी केली.
एकबोटे म्हणाले, सध्या भारतात १४ कोटी लिटर दूध उत्पादन होते. मात्र ६४ कोटी लिटर दूध विकले जाते. ही बाब गंभीर आहे. दुधाची भेसळ आणि लोकांचे आरोग्य याबाबत अन्न औषध प्रशासन सुद्धा गंभीर भूमिका घेत नाही. गोधनाचे रक्षण करण्यासाठी पोलिसांच्या बघ्याची भूमिकेमुळे गोरक्षकांना उतरावे लागत आहे. गोरक्षकांना पोलीस संरक्षण मिळावे आणि महाराष्ट्र प्राणी अधिनियम २०१५ची प्रभावी अंमलबजावणी व्हावी.
पशुसंवर्धन समिती जिल्हास्तरावर कार्यान्वित करावयाची असून पालकमंत्री आणि जिल्हाधिकारी यांनी यावर ठोस भूमिका घेणे गरजेचे आहे. स्वतंत्र टास्क फोर्स नेमून त्यासाठी जिल्हा नियोजन समितीमध्ये आर्थिक तरतूद करावयाचे नियमांत आहे. प्रशासनाने इच्छाशक्ती दाखवावी.प्रशासनाने इच्छाशक्ती दाखवावी, असे आवाहन एकबाटे यांनी केले.