Fulton, nine exiles from Quad | फलटण, कऱ्हाडमधील नऊजण हद्दपार

फलटण, कऱ्हाडमधील नऊजण हद्दपार

ठळक मुद्देफलटण, कऱ्हाडमधील नऊजण हद्दपारसंशयितांना वेळोवेळी सुधारण्याची संधी

सातारा : जबरी चोरी, मारामारी असे गंभीर विविध गुन्हे दाखल असलेल्या फलटण आणि कऱ्हाडमधील नऊजणांना पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांनी एक वर्षासाठी हद्दपार केले आहे.

अविनाश पंढरीनाथ जाधव, टोळीप्रमुख (वय २५, रा. काळुबाईनगर, मलटण, ता. फलटण), सागर हरीचंद्र डांगे (वय २२, रा. लक्ष्मीनगर, फलटण), अजय कल्लू बेनकर (वय २०, रा. नागेश्वर, चौधरवाडी, फलटण), अक्षय बाळकृष्ण माने (वय २२, रा. शंकर मार्केटजवळ, फलटण), विशाल सुरेश इंगळे (वय १९, रा. मंळवार पेठ, सातारा), विजय राजेंद्र देशमुख (वय २६, रा. समर्थ मंदिर, फलटण),मनिष महेंद्र काकडे (वय १९, रा. मंगळवार पेठ, फलटण) अशी हद्दपार करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या टोळीवर फलटण येथे जबरी चोरी आणि घरफोडीचे विविध गुन्हे दाखल आहेत. या सातजणांना सातारा जिल्हा तसेच बारामती, पुरंदर, माळशिरस तालुक्यातून एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे.

दरम्यान, कऱ्हाड शहर व परिसरात गर्दी मारामारी करणाऱ्या टोळीचा प्रमुख सिकंदर गुलाब शेख-ताशेवाले (वय ३९, रा. लक्ष्मीनगर, मलकापूर, ता. कऱ्हाड ), मजहर बद्रुह्ीन पीरजादे (वय २९, रा. बिरोबा मंदिराजवळ, मलकापूर, कऱ्हाड ) या दोघांना सातारा जिल्हा तसेच खानापूर, कडेगाव, वाळवा तालुक्यातील एक वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. बेकायदा जमाव जमवून या दोघांनी टोळी तयार केल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.

गर्दी मारामारीसारखे गंभीर गुन्हे या दोघांवर दाखल आहेत. या दोन्ही टोळीतील संशयितांना वेळोवेळी सुधारण्याची संधी देण्यात आली होती. मात्र, त्यांच्यामध्ये काहीही सुधारणा झाली नाही. त्यामुळे त्यांच्यावर हद्दपारीची कारवाई करण्यात आली आहे.

Web Title: Fulton, nine exiles from Quad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.