शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

पश्चिम भागात पावसाची पूर्ण उघडीप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 30, 2020 16:03 IST

सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची पूर्णपणे उघडीप असून, बुधवारी सकाळपर्यंत कोयनानगर, नवजा आणि महाबळेश्वरला काहीही पाऊस झाला नव्हता. तर पाण्याची आवक कमी झाल्याने कोयनेच्या दरवाजातील विसर्ग बंद असून, पायथा वीजगृहातून अवघा १०५० क्यूसेक सुरू होता. दरम्यान, पूर्व भागात अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे.

ठळक मुद्देपश्चिम भागात पावसाची पूर्ण उघडीप कोयनेच्या पायथा वीजगृहातून विसर्ग सुरूच

सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाची पूर्णपणे उघडीप असून, बुधवारी सकाळपर्यंत कोयनानगर, नवजा आणि महाबळेश्वरला काहीही पाऊस झाला नव्हता. तर पाण्याची आवक कमी झाल्याने कोयनेच्या दरवाजातील विसर्ग बंद असून, पायथा वीजगृहातून अवघा १०५० क्यूसेक सुरू होता. दरम्यान, पूर्व भागात अनेक ठिकाणी पाऊस पडत आहे.जिल्ह्याच्या पूर्व भागात मागील काही दिवसांपासून चांगला पाऊस होत आहे. ओढे-नाले वाहू लागले आहेत. या तुलनेत पश्चिमेकडे पाऊस कमी आहे. मागील महिन्यापासून पश्चिम भागात तर तुरळक स्वरुपातच पाऊस पडत आहे.

गेल्या आठवड्यापासून तर पश्चिम भागातील कोयना, नवजा, महाबळेश्वर, तापोळा, कास, बामणोली या भागात पावसाची उघडीप असल्यासारखीच स्थिती आहे. तर दोन दिवसांपासून पूर्णपणे पाऊस थांबला आहे. त्यामुळे पश्चिम भागातील प्रमुख धरणात पाण्याची आवक कमी कमी होत आहे.कोयनानगर येथे बुधवारी सकाळपर्यंत काहीच पाऊस झाला नाही. तर यावर्षी जूनपासून आतापर्यंत कोयनेला ४३३१ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर १०५.२५ टीएमसी क्षमता असणारे कोयना धरण पूर्ण भरले होते. त्यानंतर विसर्ग सुरू करण्यात आला. परिणामी बुधवारी सकाळी कोयना धरणात १०५.१४ टीएमसी पाणीसाठा होता. तर पायथा वीजगृहातून १०५० क्यूसेक विसर्ग सुरू होता. तसेच धरणाच्या दरवाजातील विसर्ग बंदच आहे.सकाळपर्यंत नवजा आणि महाबळेश्वरला काहीच पाऊस झाला नाही. तर जूनपासून आतापर्यंत नवजा येथे ५०५७ आणि महाबळेश्वरला ५००५ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.दरम्यान, सातारा शहरासह परिसरात पावसाची उघडीप कायम आहे. बहुंताशवेळा ढगाळ वातावरण कायम असते. तर पूर्व दुष्काळी भागात काही ठिकाणी चांगला पाऊस होत आहे. यामुळे खरीप हंगमातील पीक काढणीत अडचणी निर्माण होत आहेत.

टॅग्स :RainपाऊसDamधरणSatara areaसातारा परिसर