शहरं
Join us  
Trending Stories
1
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात मोठी अपडेट; झिशान अख्तरला कॅनडात पकडले, भारतात आणणार
2
येरवडा कारागृहातून शशांक हगवणे, निलेश चव्हाण पोलिसांच्या ताब्यात; शस्त्र परवाना प्रकरणी तपास करणार
3
मुंबई सोडून पुणे,नागपूरसह सर्व महापालिकांची प्रभाग रचना करण्याचे आदेश; निवडणुकांच्या तयारीला सुरुवात 
4
सोनमच्या समोरच राजावर पहिला वार झाला! चारही आरोपींनी गुन्हा कबुल केला, इंदूर क्राईम ब्रांच...
5
कामगिरी फत्ते! जगभरात पाकिस्तानचा दहशतवादी बुरखा फाडायला गेलेले परतले; सर्व 'सेनापतीं'नी घेतली मोदींची भेट
6
'ऑपरेशन सिंदूर' काळात भारताविरोधात रचला कट; मोहम्मद युनूस यांचा डाव बांगलादेश सैन्यप्रमुखानेच उधळला
7
आधी शाओमी अ‍ॅपलचे फिचर्स पळवायची, आता अ‍ॅपल...; लिक्विड डिस्प्लेवरून नेटकऱ्यांनी पुरावेच दाखविले
8
‘’लग्नानंतर पती-पत्नीला महिनाभर…”, मध्य प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या सल्ल्यावरून वाद
9
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला कट्टर धर्मवाद मान्य नाही अन् भविष्यातही असणार नाही - अजित पवार
10
...तर राजा रघुवंशी आणि सोनमच्या कुटुंबीयांविरोधात गुन्हा दाखल करणार, मेघालयच्या मंत्र्यांचा इशारा  
11
राष्ट्रवादीच्या वर्धापनदिनाला ३ महत्वाचे नेते गैरहजर; नेमकं कारण काय? अजित पवार म्हणाले...
12
स्थानिक नेतृत्व, कार्यकर्त्यांची इच्छा असेल तरच महापालिका निवडणुकीत युती - अजित पवार
13
विधानसभेला विजय मिळवण्यासाठी लाडकी बहीण योजना समोर आणली;अजित पवारांची थेट कबुली
14
एका प्रेमकहाणीचा हृदयद्रावक शेवट, पतीनं उचललं टोकाचं पाऊल, पाठोपाठ पत्नीनेही...
15
राजा रघुवंशी हत्याकांड प्रकरण: चावी गायब, गेटवरून उड्या मारत आरोपीच्या घरावर छापा; मिळाले महत्वाचे पुरावे - VIDEO
16
Viral News : सासूचा हात धरून पळून गेला जावई, तीन मुलांना घेऊन पोलीस ठाण्यात पोहोचली बायको! म्हणाली...
17
राजस्थान हादरले! ११ जण अंघोळीसाठी नदीत उतरले, वाहून गेले; ८ जणांचे मृतदेह सापडले
18
११ जूनला भद्र योग: ६ राशींना लाभ इच्छापूर्ती, बंपर नफा फायदा; गणपती-लक्ष्मी कृपेने कल्याणच होईल!
19
Mumbai Railway: “रेल्वेमंत्र्यांनी पाऊण तास चर्चा केली”; मुंबई लोकलबाबत CM फडणवीसांनी सांगितला मास्टर प्लान
20
एअरबेसवरील हल्ल्याचा बदला, रशियाचा कहर सुरूच; युक्रेनच्या शहरांवर ३०० हून अधिक ड्रोन, मिसाईल हल्ले

Satara: फरार आरोपीला बैलगाडी शर्यतीत ठोकल्या बेड्या; मोक्का, अत्याचाराच्या गुन्ह्यात होता पसार

By संजय पाटील | Updated: December 23, 2023 16:19 IST

कऱ्हाड : मोक्का कायदा तसेच अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या आरोपीला पोलिसांनी बैलगाडी शर्यतीतून उचलले. पाचवडफाटा, ता. कऱ्हाड ...

कऱ्हाड : मोक्का कायदा तसेच अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल असलेल्या आरोपीला पोलिसांनी बैलगाडी शर्यतीतून उचलले. पाचवडफाटा, ता. कऱ्हाड येथे शेतकऱ्यांच्या वेशात शर्यतीमध्ये घुसून पोलिसांनी ही कारवाई केली.अक्षय अनिल तळेकर (वय २९, रा. हरपळवाडी, ता. कऱ्हाड) असे पोलिसांनी अटक केलेल्याचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कऱ्हाड तालुक्यातील हरपळवाडी येथील अक्षय तळेकर याच्यावर सातारा तालुका पोलीस ठाण्यात मोक्का कायद्याखाली गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात तो फरार होता. फरार असताना त्याने कऱ्हाड शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका अल्पवयीन मुलीला अमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केला. याबाबतही कऱ्हाड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे दोन्ही गुन्हे दाखल असताना आरोपी अक्षय तळेकर हा गत काही महिन्यांपासून फरार होता.दरम्यान, आरोपी अक्षय तळेकर हा पाचवड फाटा येथे आयोजित बैलगाडी शर्यतीत आरोपी येणार असल्याची माहिती पोलीस पथकाला मिळाली. अक्षय तळेकर हा शर्यतीतील बैलगाडीवर चालक होता. त्यामुळे पोलिसांनी शेतकऱ्यांसारखा पेहराव करून पाचवड फाटा येथील बैलगाडी शर्यत गाठली. त्याठिकाणी शिताफीने अक्षय तळेकर याला ताब्यात घेत बेड्या ठोकल्या. पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जाधव तपास करीत आहेत.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरKaradकराडCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस