शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

Satara News: भीषण आगीत फळे विक्रेत्याचे दुकान जळून खाक, मोठे नुकसान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2023 16:28 IST

आगीचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट

माणिक डोंगरेमलकापूर : अचानक लागलेल्या भीषण आगीत फळे विक्रेत्याचे दुकान जळून खाक झाले. पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गालगत सह्याद्री हॉस्पिटलजवळ आज, बुधवारी सकाळच्या सुमारास ही घटना घडली. आगीमध्ये दुकानाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, आगीचे नेमके कारण समजू शकले नाही.याबाबत मिळालेली माहिती अशी की, वारुंजी फाटा येथून पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग ते जुन्या ब्रिटिशकालीन पुलावरून कऱ्हाडमध्ये येणारा रस्ता आहे. या मार्गावर फळे विक्री करणाऱ्या व्यावसायिकांची दुकाने आहेत. आज, सकाळच्या सुमारास येथील एका फळाच्या दुकानास अचानक आग लागली. दुकानास आग लागल्यामुळे परिसरात धुरांचे मोठ्या प्रमाणात लोट पसरले. यावेळी परिसरातील इतर फळ विक्रेत्यांमध्ये एकच गोंधळ उडाला. विक्रेत्यांसह नागरिकांनी आग विझविण्याचा प्रयत्न केला. मात्र, आग आटोक्यात येत नसल्याचे निदर्शनास आले. काही वेळातच आगीने रौद्ररूप धारण केले. दरम्यान, काही नागरिकांनी या घटनेची माहिती पोलिस व कऱ्हाड नगरपालिकेच्या अग्निशामक दलाच्या पथकास दिली. यानंतर कऱ्हाड पालिका अग्निशामक दलाचे बंब व कर्मचारी तत्काळ घटनास्थळी दाखल झाले. अर्ध्या तासाच्या प्रयत्नानंतर आग विझविण्यात यश आले.

मात्र, तोपर्यंत फळविक्रेत्याच्या दुकानासह माल व साहित्य जळून खाक झाले. या आगीत हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. ही आग नेमकी कशामुळे लागली? त्याचे कारण अद्याप समजू शकले नाही. अधिक तपास पोलिसांकडून केला जात आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरfireआग