शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

कडाक्याची थंडी अन् स्ट्रॉबेरीची गोडी, महाबळेश्वर, पाचगणीच्या बाजारपेठेत फळे विक्रीसाठी दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 19, 2017 15:15 IST

पर्यटनस्थळाबरोबरच स्ट्रॉबेरी लॅण्ड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर व पाचगणीत स्ट्रॉबेरी फळाचा हंगाम सुरू झाला आहे. या ठिकाणी भेट देणाऱ्या पर्यटकांनाही आता कडाक्याची थंडी अन् स्ट्रॉबेरीची गोडी चाखायला मिळू लागली आहे. स्ट्रॉबेरी हे महाबळेश्वरचे मुख्य पिक असून थंडीत येणारे एकमेव फळ आहे.

ठळक मुद्देस्ट्रॉबेरी महाबळेश्वरचे मुख्य पिक, थंडीत येणारे एकमेव फळदेशाच्या एकूण उत्पादनापैकी ८७ टक्के उत्पादन एकट्या महाबळेश्वर तालुक्यातून

सातारा : पर्यटनस्थळाबरोबरच स्ट्रॉबेरी लॅण्ड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर व पाचगणीत स्ट्रॉबेरी फळाचा हंगाम सुरू झाला आहे. या ठिकाणी भेट देणाऱ्या पर्यटकांनाही आता कडाक्याची थंडी अन् स्ट्रॉबेरीची गोडी चाखायला मिळू लागली आहे.स्ट्रॉबेरी हे महाबळेश्वरचे मुख्य पिक असून थंडीत येणारे एकमेव फळ आहे. देशाच्या एकूण उत्पादनापैकी ८७ टक्के उत्पादन एकट्या महाबळेश्वर तालुक्यातून घेतले जाते. पावसाळा संपताच तालुक्यात स्ट्रॉबेरीची लागवड केली जाते.

याठिकाणी प्रामुख्याने स्वीटचार्ली, कामारोजा, विंटर डाऊन या जातीच्या रोपांची लागवड मोठ्या प्रमाणात होते. स्वीटचार्ली हे फळ आकाराने मोठे, रसाळ व गोड असल्याने पर्यटकांमधून स्वीट चार्लीला सर्वाधिक मागणी होत असते.सध्या स्ट्रॉबेरी पिकाला पोषक वातावरण निर्माण झाले असून फळे विक्रीसाठी बाजारपेठेत दाखल झाली आहे. उत्पादन कमी असल्याने सध्या २५० रुपये किलो या दराने स्ट्रॉबेरीची विक्री केली जात आहे. येथील अल्हाददायक वातावरणाची मजा लुटण्यासाठी येणाऱ्या पर्यटकांना आता स्ट्रॉबेरीची गोडी चाखायला मिळत आहे.

टॅग्स :Mahabaleshwar Hill Stationमहाबळेश्वर गिरीस्थानfruitsफळे