चिमुकल्यांनी विकली ताजी भाजी
By Admin | Updated: April 13, 2015 00:04 IST2015-04-12T22:42:28+5:302015-04-13T00:04:23+5:30
किरपेत बालबाजार : बालगोपाळांच्या धिटाईने ग्रामस्थही हरखले

चिमुकल्यांनी विकली ताजी भाजी
तांबवे : किरपे, ता. कऱ्हाड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी भरवलेल्या बाजाराने सर्वच ग्रामस्थ भारावून गेले. बाजारामध्ये आपल्या पाल्याने आणलेल्या भाजी विक्रीतून त्यांना आर्थिक ज्ञानाची माहिती मिळत असल्याने या उपक्रमांबाबत ग्रामस्थांनी कौतुक केले. शासनाच्या उद्दिष्टानुसार विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास हा प्राथमिक शाळेतच होतो. त्यासाठी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी अशा प्रकारचे विविध उपक्रमांचे आयोजन केले जाते. त्या दृष्टीने किरपे जिल्हा परिषद शाळेच्या वतीने पहिली ते सातवी मधील विद्यार्थ्यांच्या भाजीपाला बाजाराचे आयोजन बुधवारी करण्यात आले. जिल्हा परिषद शळेत भरलेल्या बाजारात वांगी, शेवगा, मेथी, आंबे, चवळी, वडापाव, भजी अशा विविध पदार्थांची विक्री मुलांनी केली. त्याच्या खरेदीसाठी गावातील तरुणवर्ग, महिलावर्ग, ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात उपस्थिती लावली. किरपे परिसरात तांबवे येथे आठवड्यातून एकदा शनिवारी बाजार भरतो. त्यानंतर नागरिकांना आठवडाभर भाजी पुरवावी लागते. मात्र, बुधवारी जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी भरवलेल्या बाजारामुळे नागरिकांना शाळेतील विद्यार्थ्यांनी भरवलेल्या बाजारामुळे नागरिकांनी ताजी भाजीपाला घेता आल्याने अशा उपक्रमांचे नियमित आयोजन करावे,
असेही ग्रामस्थ, महिलांनी सांगितले. शाळेत भरवलेल्या बाजारासाठी शिक्षक एस. व्ही. सरगडे, पी. डी. कारंडे यांनी परिश्रम घेतले. (वार्ताहर)
५
स्वस्त भाजीला मोठी मागणी
किरपे येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये शाळेच्या स्थापनेपासून पहिल्यांदाच एवढा मोठा बाजार भरविण्यात आला होता. या बाजारात लहान मुलांनी स्वस्त दराने ताजी भाजी विकण्यासाठी आणली असल्याने त्याची ग्रामस्थांकडून ही आवडीने खरेदी करण्यात आली.
आमच्या जिल्हा परिषद शाळेतर्फे भरवलेल्या बाजारात मी आमच्या शेतातील भाजी विकली. त्यातून मला पैसे मिळाले. नफा-तोटा, खरेदी-विक्रीचा या बाजारामुळे मला अनुभव मिळाला.
- मंगेश गुरव, विद्यार्थी