चौकट :
चक्क टायरमध्ये भाजी
अनेकांकडे चारचाकी गाड्या असतात. अशा गाड्यांचे टायर खराब झाल्यानंतर ते आपण फेकून देत असतो. मात्र त्याचा सदुपयोग फारसे कोणी करत नाही. साताऱ्यातील एका व्यक्तीने मात्र त्याचा भाज्या पिकवण्यासाठी वापर केला. यामध्ये मोठ्या टायरचे दोन-तीन तुकडे केले. त्यामध्ये माती भरून त्यात भाज्या पिकवल्या. या टायरला आकर्षक रंगरंगोटी केली. त्यामुळे ते दिसायलाही छान दिसतात. घराच्या सौंदर्यात भरच पडत आहे. तसेच ताज्या, सेंद्रिय भाज्या मिळू लागल्या, हा त्यापेक्षाही मोठा आनंद होता.
चौकट :
मुलांची नाळ मातीशी जोडण्याचा प्रयत्न
आम्ही लहान असताना खेड्यात राहत होतो. तेव्हाही आम्हाला शेती नसली तरी दिवसभर मित्रांच्या शेतात जायचो. सुटी असल्याने दारं धरण, पिकांना पाणी पाजणं, सुकीच्या दिवसात पक्ष्यांपासून पिकांचे राखण करायला जायचो. आता मात्र नोकरीनिमित्ताने साताऱ्यात आल्याने मुलंही येथेच आहेत. शाळांमुळे गावांकडे त्यांचं फारसं जाणं होत नाही. लाॅकडाऊन हिच आमच्यासाठी संधी समजून अंगणात दररोज लागतील अशा भाज्यांचे उत्पादन घेण्याचा निर्णय घेतला. हे करत असताना प्रत्येक घडामोडीत मुलांना सोबत घेतलं. लहानलहान गोष्टींमधून मुलांना आनंद घेऊ दिला. यामुळे तरी त्यांची मातीशी नाळ जोडली जाईल, अशी आशा पोपट सालसकर यांनी व्यक्त केली.