पूरबाधित गावांतील जनावरांसाठी मोफत लसीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 20, 2019 08:29 PM2019-08-20T20:29:33+5:302019-08-20T20:35:04+5:30

महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर अंतर्गत असलेल्या शिरवळ, परभणी, मुंबई, नागपूर, उदगीर व अकोला येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील पूरग्रस्त भागात जनावरांना मोफत लसीकरण व उपचार शिबिरे आयोजित केली आहे

Free vaccination for animals in flooded villages | पूरबाधित गावांतील जनावरांसाठी मोफत लसीकरण

शिरवळ येथील क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयात सहभागी प्राध्यापक व विद्यार्थी पूरग्रस्त भागात जाऊन जनावरांना आरोग्य सेवा देत आहेत.

Next
ठळक मुद्दे: शिरवळमधील क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयाचा उपक्रम-शेतकऱ्यांना मार्गदर्शन

शिरवळ : सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत पूर परिस्थितीमुळे मानवासोबतच जनावरांचेही नुकसान झाले. कित्येक जनावरे वाहून गेली तर काही बुडून मरण पावली. सतत भिजल्याने कित्येक जनावरे आजारी पडली आहेत. त्यांच्यावर त्वरित उपचार करणे गरजेचे आहे. रोगराई पसरण्याची दाट शक्यता असल्याने पूरभागात जनावरांसाठी मोफत लसीकरण करण्यात आले.

महाराष्ट्र पशू व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूर अंतर्गत असलेल्या शिरवळ, परभणी, मुंबई, नागपूर, उदगीर व अकोला येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयाच्या वतीने सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील पूरग्रस्त भागात जनावरांना मोफत लसीकरण व उपचार शिबिरे आयोजित केली आहे, अशी माहिती शिरवळ येथील क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सतीश दिग्रसकर यांनी दिली.

महाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठ, नागपूरचे कुलगुरू डॉ. आशिष पातुरकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यापीठातील तज्ज्ञ प्राध्यापक व विद्यार्थ्यांची पथके गावागावात जाऊन जनावरांना लसीकरण व उपचार करून पशुपालकांना पूरपरिस्थितीनंतर जनावरांची घ्यावयाची काळजी या विषयी मार्गदर्शन करत आहेत.

या सर्व पथकाचे नियंत्रण व नियोजन क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय शिरवळचे सहयोगी अधिष्ठाता डॉ. सतीश दिग्रसकर करत आहेत. जिल्हा प्रशासन व महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागाशी योग्य समन्वय साधून ते मोहीम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न करत आहे.

मागील तीन दिवसांत सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांतील अनेक पूरग्रस्त भागातील हजारो जनावरांना लसीकरण व आजारी जनावरांवर उपचार केले आहे. या शिबिरात शिरवळ महाविद्यालयातील डॉ. मुकुंद आमले, डॉ. मिलिंद मेश्राम, डॉ. विश्वंभर पाटोदकर, डॉ. विकास वासकर, डॉ. अनिल उलेमाले, डॉ. स्मिता कोल्हे, डॉ. राहुल कोल्हे, डॉ. प्रशांत म्हसे, डॉ. अजित माळी, डॉ. महेश रागंणेकर, डॉ. रवी सूर्यवंशी, डॉ. राजेंद्र घाटगे, डॉ. मिलिंद नांदे, डॉ. विठ्ठल धायगुडे, डॉ. विकास कारंडे, डॉ. कविता खिल्लारे, डॉ. शलाका साळवेकर, डॉ. अविनाश कदम, डॉ. बापूराव कदम, डॉ. गोकुळ सोनवणे सहभागी झाले आहेत.
 

Web Title: Free vaccination for animals in flooded villages

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.