शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

भाजप खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यासह अन्य तिघांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2022 15:07 IST

फलटण : माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यासह अन्य तिघांविरुद्ध न्यायालयाच्या आदेशानंतर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात फसवणुकीचा ...

फलटण : माढा लोकसभा मतदार संघाचे खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यासह अन्य तिघांविरुद्ध न्यायालयाच्या आदेशानंतर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, दिगंबर आगवणे यांच्यावरही फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.लोकनेते हिंदुराव नाईक-निंबाळकर साखर कारखान्याची खोटी बिले बनवून आपली कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार दिगंबर आगवणे यांनी न्यायालयात केली होती. न्यायालयाच्या आदेशानुसार खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर व कारखान्याचे इतर तीन संचालकांवर फसवणुकीचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. याबाबत तीन महिन्यांत अहवाल सादर करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.तर दुसरीकडे गिरीश ऊर्फ विपुल बजरंग येवले ( वय ३३, रा. मुंजवडी, ता. फलटण) यांनी दिलेल्या तक्रारीवरून दिगंबर आगवणे यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. आगवणे यांनी दहा लाख रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. सन २०१९ मध्ये दिगंबर आगवणे यांनी येवले यांच्याकडून त्यांचे नातेवाईक व माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले यांच्या मध्यस्थीने दहा लाख रुपये विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी घेतले होते.‘निवडणूक झाल्यावर पैसे देतो,’ असे त्यांनी सांगितले होते. मात्र, निवडणूक होऊन तीन वर्षे झाली तरी पैसे न देता त्यांनी टाळाटाळ केली तसेच खोटा धनादेश देऊन आर्थिक फसवणूक केल्याचे येवले यांनी तक्रारीत म्हटले आहे.

टॅग्स :Satara areaसातारा परिसरRanjitshinh Naik-Nimbalkarरणजितसिंह नाईक-निंबाळकरCrime Newsगुन्हेगारीfraudधोकेबाजी