चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे २४ पासून आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:26 IST2021-06-17T04:26:35+5:302021-06-17T04:26:35+5:30
सातारा : जिल्हा रुग्णालयातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे प्रश्न अनेक महिन्यापासून प्रलंबित आहेत. आमच्या मागण्या मान्य व्हाव्या यासाठी गुरुवार दि. २४ ...

चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे २४ पासून आंदोलन
सातारा : जिल्हा रुग्णालयातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांचे प्रश्न अनेक महिन्यापासून प्रलंबित आहेत. आमच्या मागण्या मान्य व्हाव्या यासाठी गुरुवार दि. २४ जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचा इशारा चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे दिला आहे.
जिल्हा रुग्णालयातील चतुर्थश्रेणी कर्मचाऱ्यांची रिक्त पदे तत्काळ भरण्यात यावीत. अनुकंपा तत्त्वावरील चालू वर्षातील नेमणुका तत्काळ करण्यात याव्यात. १०, २०, ३० वर्षांनंतरची मिळणारी अश्वाशीत प्रगती योजनेचा लाभ देण्यात यावा. दुय्यम सेवा पुस्तके भरून मिळावीत, सातवा वेतन आयोगाप्रमाणे वेतन निश्चिती करून फरकासह वेतन देण्यात यावे यासह अन्य मागण्यांसाठी अनेक महिन्यांपासून पाठपुरावा सुरु आहे. मात्र, त्यावर फक्त आश्वासन दिली जात आहेत. जिल्हा शल्यचिकित्सक हे या मागण्या मान्य करण्यासाठी चालढकल करत असल्याने गेल्या चार दिवसांपासून शल्यचिकित्सक यांच्या दालनासमोर साखळी उपोषण सुरु आहे. त्याकडेही लक्ष दिले जात नाहीत. त्यामुळे आमच्या मागण्या तत्काळ मान्य कराव्यात, अन्यथा गुरुवार दि. २४ जूनपासून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर बेमुदत धरणे आंदोलन करणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर जिल्हाध्यक्षा सुरेखा चव्हाण, प्रकाश घाडगे आदींच्या सह्या आहेत.