शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गज्या मारणे टोळीशी संबंधित चौदा जण वाई पोलिसांच्या ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 18:43 IST

CoronaVirus Crime Wai Satara : करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात टाळेबंदी व जिल्हा बंदीचा आदेश मोडून सातारा जिल्ह्यात प्रवेश केलेल्या चौदा जणांना वाई पोलिसांनी ताब्यात घेतले. हे सर्व जण पैसे वसुलीसाठी आल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. यातील काही जणांचा पुण्यातील गज्या मारणे टोळीशी संबंध असल्याचे समजल्याने त्याच्याकडे पोलीस कसून चौकशी करत आहेत.

ठळक मुद्देगज्या मारणे टोळीशी संबंधित चौदा जण वाई पोलिसांच्या ताब्यातपोलीस कसून चौकशी करत आहेत

वाई : करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यात टाळेबंदी व जिल्हा बंदीचा आदेश मोडून सातारा जिल्ह्यात प्रवेश केलेल्या चौदा जणांना वाईपोलिसांनी ताब्यात घेतले. हे सर्व जण पैसे वसुलीसाठी आल्याचे पोलीस तपासात पुढे आले आहे. यातील काही जणांचा पुण्यातील गज्या मारणे टोळीशी संबंध असल्याचे समजल्याने त्याच्याकडे पोलीस कसून चौकशी करत आहेत.राज्यात टाळेबंदी व जिल्हा बंदीचा आदेश मोडून सातारा जिल्ह्यात प्रवेश केलेल्या चौदा जणांना वाई पोलिसांनी भीमनगर तिकटण्याच्या तपासणी नाक्यावर दुपारी ताब्यात घेतले. हे सर्वजण पाचगणी व वाई येथील दोघांकडे पैशांच्या वसुलीसाठी आल्याचे पोलीस तपासात पुढे आले. या प्रकरणात संबंधितांचे रेकॉर्ड तपासण्याचे काम सुरु होते. उशिरापर्यंत त्यांना अटक करण्यात आलेली नव्हती.वाई येथील बिल्डर व पाचगणी येथील एका शाळेच्या चालकाशी संबंधित पैशाच्या देण्याघेण्याच्या व्यवहारातील वसुलीसाठी पुण्यातील हे चौदा जण तीन मोटारीतून वाईला आले होते. पाचगणी येथे जाऊन व नंतर वाईत एकाच्या घरी जाऊन पुणे - महाबळेश्वर रस्त्यावरील वाई भीमनगर तिकाटण्यातील तपासणी नाक्यावर त्यांच्या गाड्या अडविण्यात आल्या.

पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे व कर्मचाऱ्यांनी त्यांना वाई पोलिस ठाण्यात आणले. त्यांच्याकडे अधिक चौकशी करण्यात येत आहे. पुणे शहर व पुणे ग्रामीण पोलिसांना याबाबत माहिती कळविण्यात आली आहे. त्यांच्याकडून दप्तर अहवाल मागविण्यात आला आहे. या चौदा जणातील अनेक जण गज्या मारणे टोळीशी संबंधित असल्याचे निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांकडून समजली.

उशिरा पर्यंत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता व त्यांना अटकही करण्यात आली नव्हती. पोलिसांनी संबंधित बिल्डर व पाचगणीतील शाळा चालकालाही चौकशीसाठी पोलीस ठाण्यात बोलावले होते. या दोघानी संबंधित चौदा जणांविरुद्ध कोणतीही तक्रार नसल्याचे तोंडी सांगितल्याचे पोलीस सूत्रांनी स्पष्ट केले. दरम्यान पोलीस पुण्यातील अहवालाच्या प्रतीक्षेत असल्याने उशिरापर्यंत कोणतीही कारवाई झालेली नाही.मात्र त्यांच्यावर जिल्हा बंदी आदेशाचे उल्लंघन केल्याचा गुन्हा पोलीस दाखल करणार आहेत व नंतर पुढील कारवाई करण्यात येणार आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPoliceपोलिसwai-acवाईSatara areaसातारा परिसर