गैरसमजुतीतून वार करणाऱ्यास चार वर्षे शिक्षा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 27, 2020 04:50 PM2020-02-27T16:50:35+5:302020-02-27T16:51:37+5:30

भांडणे लावली या गैरसमजातून एकावर धारदार शस्त्राने वार करून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्ग-२ एन. एल. मोरे यांनी अतुल ज्ञानदेव बर्गे (वय ३५, रा. दत्तनगर, कोरेगाव) याला चार वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

Four years punishable by misdemeanor | गैरसमजुतीतून वार करणाऱ्यास चार वर्षे शिक्षा

गैरसमजुतीतून वार करणाऱ्यास चार वर्षे शिक्षा

googlenewsNext
ठळक मुद्देगैरसमजुतीतून वार करणाऱ्यास चार वर्षे शिक्षा डोक्यात धारदार शास्त्राने केले वार

सातारा : भांडणे लावली या गैरसमजातून एकावर धारदार शस्त्राने वार करून खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायाधीश वर्ग-२ एन. एल. मोरे यांनी अतुल ज्ञानदेव बर्गे (वय ३५, रा. दत्तनगर, कोरेगाव) याला चार वर्षे सक्तमजुरी व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली.

या खटल्याची पार्श्वभूमी अशी, लक्ष्मण नारायण बर्गे (वय ५२, रा. महादेवनगर, कोरेगाव) यांनी भांडणे लावली, या गैरसमजातून अतुल बर्गे योने त्यांना १४ डिसेंबर २०१३ रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास कोरेगाव येथील जुना मोटर स्टँड येथे बोलावून घेतले. यावेळी त्यांच्यात बाचाबाची झाली. यातून अतुल बर्गे याने लक्ष्मण बर्गे यांच्या हातापायावर तसेच डोक्यात धारदार शास्त्राने वार केले.

यात लक्ष्मण बर्गे गंभीर जखमी झाले होते. केरेगाव पोलीस ठाण्यात याबाबत गुन्हा दाखल झाला होता. तत्कालीन सहायक पोलीस निरीक्षक दिलीप तळपे यांनी तपास करून न्यायालयात दोषारोपत्र दाखल केले. सुनावणीदरम्यान एकूण सात साक्षीदार तपासण्यात आले. त्यामधील तीन फितूर झाले.

न्यायालयापुढे आलेले पुरावे आणि साक्षिदार ग्राह्य मानून न्यायालयाने अतुल बर्गे याला चार वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. जिल्हा सहायक सरकारी वकील ज्योती दिवाकर यांनी सरकार पक्षातर्फे काम पाहिले.

Web Title: Four years punishable by misdemeanor

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.