सुमोच्या धडकेत चार वर्षांचा चिमुकला ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2019 11:24 AM2019-11-29T11:24:08+5:302019-11-29T11:25:44+5:30

म्हसवड : पिंगळी, ता. माण येथील खांडसरी चौकानजीक भरधाव सुमो गाडीने दिलेल्या धडकेत शरद नागराज चौडापुरे (वय ४, रा. ...

 Four-year-old Chimuk killed; At the beating of sumo | सुमोच्या धडकेत चार वर्षांचा चिमुकला ठार

सुमोच्या धडकेत चार वर्षांचा चिमुकला ठार

googlenewsNext
ठळक मुद्देपरंतु दौला नावाच्या कामगाराने गाडी आडवी लावून त्याला पकडले

म्हसवड : पिंगळी, ता. माण येथील खांडसरी चौकानजीक भरधाव सुमो गाडीने दिलेल्या धडकेत शरद नागराज चौडापुरे (वय ४, रा. कर्नाटक) या चिमुकल्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची दहिवडी पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, पिंगळी घाटाजवळील शासकीय दूध डेअरीसमोर वीटभट्ट्या आहेत. बाळकृष्ण यादव यांच्या वीटभट्टीवर गेल्या पंधरा दिवसांपासून नागराज तुकाराम चौडापुरे (मूळ रा. झळकिके, ता. आळंद, जि. कलबुर्गी, कर्नाटक) व पत्नी रुपा हे मजुरी करतात. नागराज यांचा मुलगा शरद रडू लागल्याने रुपा व शरद हे खांडसरी चौकातून वडापाव आणण्यासाठी दुपारी दोनच्या सुमारास गेले होते. तेथून परतत असताना साताऱ्याकडून आलेल्या सुमोने (एमएच ५० ए ७०३०) शरद चौडापुरेला पाठीमागून जोरदार धडक दिली. त्याच्या डोक्याला गंभीर मार लागल्याने शरदचा जागीच मृत्यू झाला. या अपघाताची माहिती समजताच नागराज यांच्यासह वीटभट्टीचे मालक बाळकृष्ण यादव व इतर कामगारांनी घटनास्थळी धाव घेतली. दरम्यान, सुमोचालक अमित काकडे हा घटनास्थळावरून पळून जात होता. परंतु दौला नावाच्या कामगाराने गाडी आडवी लावून त्याला पकडले.

Web Title:  Four-year-old Chimuk killed; At the beating of sumo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.