शहरं
Join us  
Trending Stories
1
जयंत पाटलांची मागणी शरद पवारांनी केली मान्य; म्हणाले,"...त्यासाठी तुमच्या सगळ्यांची तयारी पाहिजे"
2
शरद पवारांना मोठा धक्का; इथे वर्धापनदिनाचा कार्यक्रम, तिथे २ बड्या नेत्यांचा भाजपा प्रवेश
3
एकनाथ शिंदेंच्या शिलेदारांविरोधात भाजपा देतंय विरोधकांना बळ?; २ मतदारसंघात टाकला डाव
4
ऑपरेशन सिंदूरचे बक्षीस; DGMO जनरल राजीव घई यांना पदोन्नती, आता या पदावर काम करणार
5
SBI Vs HDFC: कोणत्या बँकेतून होम लोन घेणं पडेल स्वस्त; २५ लाखांवर २० वर्षांसाठी किती असेल EMI?
6
गुरु अस्त २०२५: आजपासून २७ दिवस फार महत्त्वाचे; नोकरी व्यवसायावर येऊ शकते गदा!
7
जयंत पाटील बाहेर पडणार? सुप्रिया सुळे म्हणाल्या, ‘पत्रही नाही, राजीनामाही नाही…’
8
Sonam Raghuvanshi : "माझ्या मुलाला न्याय हवाय, सोनमच्या खात्यात २० लाख..."; राजाच्या आईने केली सुनेची पोलखोल
9
Sonam Raghuvanshi : ज्या गाईडला दिला नकार, तोच बनला मोठा साक्षीदार! सोनमचं पितळ उघडं कसं पडलं?
10
दिल्लीत एका फ्लॅटला भीषण आग, जीव वाचवण्यासाठी वडिलांची दोन मुलांसह इमारतीवरून उडी, तिघांचाही मृत्यू
11
“चुकीच्या मार्गाला सुप्रिया सुळे जातील असे वाटत नाही”; संजय राऊत आशावादी, भाजपावर टीका
12
गोल्ड लोन घेताय? थांबा! RBI च्या 'या' नवीन नियमांचा तुम्हाला फायदा होणार की तोटा? वाचा सविस्तर
13
COVID19: कोरोनाचा विळखा घट्ट होतोय; राज्यातील रुग्णांचा आकडा १३०० पार!
14
“चंद्रहार पाटीलसाठी प्रतिष्ठा पणाला लावली, पण बेईमानी केली”; संजय राऊतांनी बोलून दाखवली खंत
15
...म्हणून सोनमचा प्रियकर स्वत: शिलाँगला गेला नव्हता, राजाचा काटा काढण्यासाठी असा रचला भयानक कट  
16
MBA चं स्वप्न मोडलं, घराबाहेर जाण्यावर लावली बंदी; सोनम रघुवंशीची अशी होती 'सीक्रेट लाइफ'
17
वारंवार घरातून पळून जात होती पत्नी; वैतागलेल्या पतीनं उचललं धक्कादायक पाऊल!
18
Raja Raghuvanshi Murder Case : पती राजाची 'सुपारी' देणारी सोनम रघुवंशी गर्भवती आहे का? तिची प्रेग्नंसी टेस्ट झाली अन्...
19
जयंत पाटलांची प्रदेशाध्यपद सोडण्याची इच्छा, म्हणाले, "शरद पवार यांना विनंती करतो, त्यांनी..."
20
रेश्मा शिंदेने घरातच साजरी केली वटपौर्णिमा! अभिनेत्रीसोबत साऊथ पतीनेही वडाच्या झाडाला मारल्या फेऱ्या

आनेवाडी टोलनाक्याजवळ भरधाव कारचा टायर फुटल्याने चार जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 2, 2021 19:04 IST

accident satara- पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास आनेवाडी टोलनाका ते उडतारे दरम्यान टायर फुटल्याने भरधाव कार नियंत्रण सुटून पाठीमागून येत असलेल्या कारला धडकली. यामध्ये चारजण जखमी झाले. जखमींमध्ये राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार यांच्यासह साताऱ्याचे माजी नगरसेवक सागर पावशे यांचा समावेश आहे.

ठळक मुद्देआनेवाडी टोलनाक्याजवळ भरधाव कारचा टायर फुटल्याने चार जखमीराष्ट्रवादीचे दीपक पवार, सागर पावसे यांचा समावेश

पाचवड : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर मंगळवारी दुपारी दीडच्या सुमारास आनेवाडी टोलनाका ते उडतारे दरम्यान टायर फुटल्याने भरधाव कार नियंत्रण सुटून पाठीमागून येत असलेल्या कारला धडकली. यामध्ये चारजण जखमी झाले. जखमींमध्ये राष्ट्रवादीचे जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार यांच्यासह साताऱ्याचे माजी नगरसेवक सागर पावशे यांचा समावेश आहे.भुईंज पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर साताऱ्याकडून पुण्याकडे जाण्याच्या मार्गावर मंगळवारी दुपारी एक ते दीडच्या सुमारास कार (एमएच ११ सीएस ५५४४) या गाडीचा टायर फुटला. त्यामुळे कार महामार्गाच्या कठड्यावर जाऊन धडकली. त्याचवेळी पाठीमागून येत असलेली कार (एमएच ११ एडब्ल्यू ७१६२) ला धडकली. या विचित्र अपघातात दोन्ही गाडीमधील मिळून चारजण जखमी झाले होते.अपघातानंतर महामार्गावरील वाहतूक थोडा वेळ थांबवून उपस्थितांनी लगेचच मदतकार्य केले. सर्व जखमींना उपचारासाठी सातारा येथे दाखल करण्यात आले. या अपघाताची भुईंज पोलीस ठाण्यात नोंद झाली असून हवालदार घाडगे तपास करीत आहेत.अपघातामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य दीपक पवार जखमी झाले असल्याची माहिती समजताच त्यांचे अनेक कार्यकर्ते घटनास्थळी दाखल झाले. 

टॅग्स :AccidentअपघातSatara areaसातारा परिसर